लहानपणापासून तुम्ही ऐकलंच असेल की, अन्न वाया जाऊ द्यायचे नाही.(health)त्यामुळे अनेक लोक शिळं अन्न फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी किंवा नंतर खातात. यावर विज्ञान सांगतं की, शिल्लक अन्न तुम्ही पुन्हा गरम करुन खाऊ शकता. मात्र आयुर्वेदात याचे वेगळेमत आणि काही कारणे आहेत. आयुर्वेदानुसार उरलेलं अन्न किंवा शिळं झालेलं अन्न खाणं टाळलं पाहिजे. पुढे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.ताजं तयार केलेलं अन्न अत्यंत पौष्टीक आणि हेल्दी असतं. पण शिल्लक राहीलेलं किंवा शिळं अन्न हे शरीरासाठी फायदेशीर नसतं. कारण त्यामध्ये ताज्या अन्नाइतके जीवनसत्व आणि पोषकतत्वे राहत नाहीत.

आयुर्वेदानुसार जेवण बनवल्यानंतर जास्तीत जास्त १ ते ३ तासांच्या आत ते खाल्ले पाहिजे.(health)जर तुम्हाला तुमच्या धक्काधक्कीच्या गडबडीच्या वेळेस ते अन्न खायला लागत असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित स्टोअर करुन ठेवले पाहिजे. आयुर्वेदानुसार बॅक्टेरिया वाढवण्यापासून रोखण्यासाठी आणि ते खाण्यायोग्य राहावे यासाठी आधीपासून शिजवलेले जेवण स्टोअर करताना व्हॅक्यूम पॅकिंग किंवा हीट इन्सुलेशन हा एक उत्तम पर्याय आहे.

आयुर्वेदानुसार जर तुम्ही उरलेलं अन्न खात असाल तर याने तुम्हाला अनेक पचनाच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. वात, पित्त आणि कफ या तीन मुख्य दोषांपैकी वात पचनसंस्थेशी जोडलेला आहे.(health) जेव्हा तुम्ही शिळं अन्न खाता तेव्हा शरीरात असंतुलन निर्माण होतं आणि वाताचाही धोका निर्माण होतो.तर शिजवलेलं अन्न एकातासाच्या आत खाल्याने शरीराला त्यातील महत्वाची गुणधर्म मिळतात.योग आणि आयुर्वेदात असे म्हणतात की, जेवणाच्या क्वालिटीनुसार तुमचा स्वभाव ठरतो. जर तुम्ही ताजं तयार केलेलं अन्न खात असाल तर तुम्ही दिवसभर फ्रेश फिल करता. दिवसभर तुमच्यात ऊर्जा राहते.

हेही वाचा :

‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला