नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ (Jhund)सिनेमातील अभिनेता प्रियांशू छेत्रीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वायरने बांधून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली. अधिक माहितीनुसार, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘झुंड’ या सिनेमात प्रियांशू छेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. रात्री त्याला वायरने बांधून क्रूरपणे संपवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियांशू हा वायरने बांधलेल्या आणि जखमी अवस्थेत आढळून आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, बाबू छत्री याला तारांनी बांधून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. त्याला चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. जखमी अवस्थेत आढळल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयाच्या आधारे ध्रुव लालबहादुर साहू या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा बाबू छत्री अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीराभोवती प्लास्टिकची तार गुंडाळलेली होती. स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा ऐकून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनीतपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक बाबू छत्री हा मेकोसाबाग परिसरात राहत होता, तर अटक करण्यात आलेला आरोपी ध्रुव साहू हा नारा परिसरातील रहिवासी आहे.

दोघांवरही यापूर्वी चोरी आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रियांशू उर्फ बाबू छेत्री हा देखील अनेक प्रकरणांमध्ये आरोपी होता. त्याच्याविरोधात पोलिसांत अनेक गुन्हे देखील दाखल होते. किरकोळ वादामुळे त्याची हत्या झाल्याचे बोलले जात आहे(Jhund).

हेही वाचा :

RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध; ठेवीदारांना खात्यातील पैसे काढता येणार नाहीत
दूषित पाण्याचा कहर….
सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता