अटल पेन्शन(Pension) योजना, जी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती, आता नवीन नोंदणी नियमांसह लागू करण्यात आली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण ने 1 ऑक्टोबर 2025 पासून जुने अर्ज स्वीकारणार नाहीत, आणि FATCA/CRS माहिती देणे अनिवार्य केले आहे, ज्यामुळे परदेशी नागरीक योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत.

महत्त्वाचे बदल :

सर्व अर्ज नवीन APY फॉर्म द्वारे भरावे लागतील.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी PRAN किट: इलेक्ट्रॉनिक 18 रुपये, कार्ड 40 रुपये; वार्षिक देखभाल शुल्क 100 रुपये.

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी शिल्लक रक्कमेनुसार वार्षिक देखभाल शुल्क: 2 लाखांपर्यंत 100 रुपये, 50 लाखांपेक्षा अधिक 500 रुपये.

सर्व व्यवहारावरील शुल्क माफ.

अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये :

भारतीय नागरिकांसाठी, विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी.

60 व्या वर्षी लाभार्थ्यांना महिना 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळण्याची हमी.

योजना 18 ते 40 वर्षांपर्यंत सर्व पात्र नागरिकांसाठी खुली.

आयकर भरणाऱ्या नागरिकांना अर्ज करण्यास मनाई; नियमांचे उल्लंघन झाल्यास खाते बंद.

सरकारने ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केली होती (Pension)आणि त्यानंतर तिची लोकप्रियता वाढल्याने नियम सुसंगत करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये नवीन अर्ज भरूनच लाभ मिळवता येईल.

हेही वाचा :

नवविवाहित जोडप्याने सर्वांसमोर ओढले पांघरूण अन्… लाजेने सर्व चूर….Video Viral
महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का
नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार