पुणे शहरात मंगळवारी २१ ओक्टोबर रोजी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, आता पुन्हा हवामान (rain)बदलण्याची चिन्हे दिसत असून, बुधवारी २२ ओक्टोबरला मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरासाठी ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.

मंगळवारी शहरातील तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली. शिवाजीनगरमध्ये कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर लोहगाव, लवळे आणि कोरेगाव पार्क परिसरात ३४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदले गेले. हवामान विभागानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, पावसाच्या (rain)हलक्या सरी शहरभर पडण्याचा अंदाज आहे. बुधवारी पुण्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील, तसेच काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवस शहरातील कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्याचा त्रास काहीसा कमी होईल, मात्र पावसामुळे रस्त्यांवर ओलसरपणा वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आल्याने हवामानातील अनिश्चिततेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी वाहनधारकांनी सावधगिरी बाळगावी, असेही हवामान विभागाने सुचविले आहे.

विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना सुरू असल्यास उघड्यावर न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारपासून पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी दोन अंश सेल्सिअसने घट होणार असून, हवामान थंडगार राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, मात्र दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहून अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे तापमानात होणारी घट पुणेकरांसाठी काहीशी दिलासादायक ठरणार आहे.सध्या सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे दिवसाचा उकाडा कमी जाणवतो आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही शहरात अधूनमधून पावसाच्या सरी पडत राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

व्यवसायात अपेक्षित यश मिळविण्यासाठी करा हे उपाय
Royal Enfield Meteor 350 की Yezdi Roadster,
सोन्याच्या किमतीत आज पुन्हा बदल, चांदीचे भाव घसरले!