भारतातील सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल पाहायला मिळाला आहे.(gold)गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र, आज शनिवारी म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसून आले आहे. चांदीच्या दरातही काहीसा उतार पाहायला मिळाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात हा दर घसरल्याने सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहे.

बुलियन मार्केटच्या माहितीनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२३,५५० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर ११३,२५४ रुपये इतका आहे.(gold) तसेच, १ किलो चांदीचा दर १४७,५०० रुपये असून १० ग्रॅम चांदीचा दर १,४७५ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्ज यामुळे दागिन्यांच्या किमती शहरानुसार बदलतात.मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरांमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ११३,०४३ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर १२३,३२० रुपये इतका आहे. त्यामुळे देशातील सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

सोने खरेदी करताना नेहमी विचारले जाते की २२ कॅरेटचे सोने घ्यायचे की २४ कॅरेटचे? (gold)अनेकांना या दोन प्रकारातील फरक माहिती नसतो. प्रत्यक्षात २४ कॅरेट सोने हे ९९.९% शुद्ध असते, परंतु त्याचे दागिने बनविणे शक्य नसते कारण ते खूप मऊ असते. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी सर्रास २२ कॅरेट सोने वापरले जाते. २२ कॅरेट सोन्यात सुमारे ९१% शुद्ध सोने असते आणि उर्वरित ९% तांबे, चांदी, जस्त यांसारख्या धातूंचे मिश्रण केले जाते. यामुळे त्याची टिकाऊपणा वाढतो आणि दागिन्यांना आकार देणे सोपे जाते. त्यामुळे दागिने विक्रीसाठी बहुतेक सराफे २२ कॅरेट सोन्यालाच प्राधान्य देतात.

सध्या दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने सोन्याच्या किमतींमध्ये घट झाल्याचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो. बाजारात दर घटल्यामुळे दागिने खरेदीसाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.(gold) तथापि, वरील दर सूचक असून त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. त्यामुळे अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधणे योग्य ठरेल.एकूणच, आजचा दिवस सोन्याचे चाहते आणि ग्राहकांसाठी आनंदाचा ठरला आहे. सोन्याच्या भावात झालेल्या या घसरणीमुळे पुन्हा एकदा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज; ऑक्टोबरचा हप्त्या ‘या’ दिवशी जमा होणार

सणासुदीच्या काळात ‘या’ ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या

पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल