देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) त्यांच्या ग्राहकांसाठी मल्टी-ऑप्शन डिपॉझिट योजना सादर करत आहे, जी बँक एफडीसारखी सुरक्षित गुंतवणूक करण्याचा पर्याय देते(Scheme) आणि गरज पडल्यास पैसे काढण्याची मुभा देखील देते.

ही योजना टर्न डिपॉझिट प्रकारची असून ग्राहक त्यांचे पैसे एफडीप्रमाणे गुंतवू शकतात. परंतु सामान्य एफडीच्या तुलनेत, या योजनेत ग्राहकांना पैसे आवश्यक तेव्हा काढण्याची मुभा आहे. यामुळे ग्राहकांना एफडीसारखा सुरक्षित परतावा मिळतो आणि पैशांची लिक्विडिटी देखील राखली जाते.

या योजनेत पैसे चालू किंवा बचत खात्याशी जोडलेले राहतात. ग्राहक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांचे पैसे वापरू शकतात, आणि उर्वरित रक्कम एफडीप्रमाणे व्याज मिळवत राहते. ग्राहकांनी या योजनेत(Scheme) मर्यादा निश्चित करावी लागते. जेव्हा पैसे ही मर्यादा ओलांडतात, तेव्हा उर्वरित रक्कम आपोआप एफडीमध्ये रूपांतरित होते आणि त्यावर एफडीसारखे व्याज मिळते.

एसबीआयच्या मल्टी-ऑप्शन डिपॉझिट योजनेची खासियत म्हणजे सुरक्षितता आणि लिक्विडिटी एकत्र मिळणे. ग्राहकांना त्यांच्या पैशावर सामान्य बँक एफडीसारखे व्याज मिळते, पण आवश्यकतेनुसार पैसे काढण्याची मुभा देखील आहे.या योजनेमुळे ग्राहक आता त्यांच्या बजेटनुसार सुरक्षित गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात, तसेच गरज पडल्यास त्यांच्या पैशांची सहज उपलब्धता देखील राहते.

हेही वाचा :

धर्मेंद्र यांची प्रॉपर्टी – पैसा मला…, हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य…
नागरिकांसाठी आनंदाची बातमी! RBI डिसेंबरमध्ये कर्ज दर कमी करण्याची शक्यता
21 लाख मोबाईल नंबरवर बंदी, तुमचा फोन लागतोय ना? कारण जाणून घ्या