कोल्हापूर : पंचगंगा(Panchganga) स्मशानभूमीत बुधवारी (दि. 26) सकाळी रक्षाविसर्जनावेळी किरकोळ कारणावरून दोन नातेवाईक गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. रक्षाविसर्जनाला वेळेत न आल्याची कारणावरून वाद वाढत गेला आणि अखेर दोन्ही बाजूंनी अंत्यसंस्काराच्या तिरडीच्या काठ्यांनीच एकमेकांवर हल्ला चढवला. या धक्कादायक मारहाणीमध्ये चारजण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

जखमींमध्ये विकास रामचंद्र गेजगे (55), निवास रामचंद्र गेजगे (50), सुनंदा दगडू पारसे (65) आणि पूजा दगडू पारसे (35, सर्व रा. इचलकरंजी) यांचा समावेश आहे. घटना घडताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

गेजगे कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची बहीण अलका बाळू करडे (60, रा. जरगनगर) यांचे 25 नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. मंगळवारी पंचगंगेत(Panchganga) अंत्यसंस्कार पार पडले. बुधवारी सकाळी रक्षाविसर्जन होता. इचलकरंजीतील नातेवाईक थोडे उशिरा स्मशानभूमीत पोहोचले. यावरून मृताच्या नणंदेच्या मुलांनी ‘उशीर का केला?’ अशी विचारणा करत भांडणाला सुरुवात केली. थोड्याच वेळात वादाने उग्र रूप धारण करून हाणामाऱ्याचे स्वरूप घेतले.

स्थळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंना शांत केले. दरम्यान, निवास गेजगे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात वैभव राजू पाटील, शुभम पाटील, नीलेश करडे, रेश्मा दत्ता भजनावळे यांच्यावर मारहाणीचा आरोप केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार

एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral

हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!