कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे(political news) ज्येष्ठ नेते अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हाच्या एका भाषणात त्यांनी आणखी काही वर्षानंतर आम्हाला कुबड्यांची गरज भासणार नाही असे वक्तव्य केले होते. आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे आणि तो वाढताना दिसतो आहे. डहाणू आणि पालघर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात महायुतीमध्येच जुंपलीआहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(political news) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही भाषणात राम, रावण आणि लंका यांचे संदर्भ एकमेकांवर टीका करण्यासाठी आले आहेत. रावणाची लंका त्याच्या अहंकारामुळे जळून खाक झाली. आता या निवडणुकीत दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदानाच्या माध्यमातून आपणाला ही अहंकाराची लंका खाक करावयाची आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटल्यानंतर त्याच ठिकाणी झालेल्या एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार करताना, आम्ही रामभक्त आहोत, श्री रामाचे अधिष्ठान असलेल्या देशातच राहतो आहोत. त्यामुळे इथे लंका नाही आणि म्हणूनच ते जळून खाक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रामाने लंका जाळली. आपणाला इथेच करायचे आहे असे फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांना फोडण्याचे सत्र त्यांनी चालू केले. म्हणून नाराज झालेल्या एकनाथ शिंदे यांनी तडक नवी दिल्ली गाठली आणि अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडली. पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणखी नाराज झाले आहेत.
तर इकडे कोकणात सिंधुदुर्ग मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे(political news) आमदार निलेश राणे यांनी मालवण नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरात स्टिंग ऑपरेशन केले. पोलिसांना घेऊन ते त्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गेले आणि तिथे नोटांनी भरलेली बॅग दाखवली. मतदारांना वाटण्यासाठी हे पैसे आणलेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच पैसे घेऊन कोकणात येतात. पैसे घेऊन निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा घनाघात निलेश राणे यांनी केल्यामुळे शिंदे यांच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील नाराजीची दरी रुंदावत चाललेली आहे असे दिसते.
एक वर्षांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे हे एका विधानसभा मतदारसंघात वाटण्यासाठी करोडो रुपये घेऊन एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हा तेथे आई ठाकूर यांनी राडा केला होता. आता असाच काहीसा प्रकार निलेश राणे यांच्याकडून होताना दिसतो आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेतील आणखी एक नेते आणि महायुती(political news) मधील एक मंत्री शिरसाट हे सुद्धा भाजपवर जहाल टीका करत आहेत. भाजपच्या नेत्यांना माज आला आहे तो आम्ही उतरवू अशी भाषा त्यांनी वापरली आहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस प्रतिस्पर्धी म्हणून काही ठिकाणी लढताना दिसत आहे.
मैत्रीपूर्ण लढत असा गोंडस शब्द दिला गेला असला तरी शत्रुत्वाच्या भूमिकेतूनच या लढती होत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्यातील दुरावा पुढे येत आहे. समारंभाच्या निमित्ताने एकत्र येऊनही ते परस्परांकडे पहात नाहीत किंवा त्यांच्यात संवाद होत नाही हे अनेकदा सर्वसामान्य जनतेने पाहिले आहे.
2014 मध्ये थोड्या उशिरा शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाली होती. तेव्हाही शिवसेनेतील काही मंत्री, नेते हे भाजपावर सडकून टीका करताना दिसले होते. तेव्हा सत्तेत राहून उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावत होती. आताही एकनाथ शिंदे यांची शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असूनही टीका करताना दिसते आहे.
महापालिकांच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा शिंदे आणि फडणवीस यांच्यातील अंतर वाढलेले असेल. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुराव्याचे चित्र अधिक गडद होईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
हेही वाचा :
‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार
एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral
हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!