राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणूक आयागाने(offices)नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर सध्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. 2 डिसेंबरला राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यानिमित्ताने सर्वच पक्ष मैदानात उतरले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं यासाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.2 डिसेंबरला सार्वत्रिक निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली आहे.

आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, (offices)इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे व वडगाव मतदारसंघांना ही सुट्टी लागू असणार आहे. केंद्र व निमशासकीय कार्यालये तसंच बँकाही यावेळी बंद राहणार आहेत. पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन प्रशासनाकडून कऱण्यात आलं आहे.सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या. राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल (offices)करण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जसाठी अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
माघार घेण्याची मुदत – 21 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
मतमोजणी – 3 डिसेंबर
शासन अधिकृत निकाल – 10 डिसेंबर

विभागनिहाय नगरपरिषद (offices)- नगरपंचायत निवडणुका
कोकण – 27
नाशिक – 49
पुणे – 60
छत्रपती संभाजीनगर – 52
अमरावती – 45
नागपूर – 55

हेही वाचा :

‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार

एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral

हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!