आज डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत.(expensive) डिसेंबर महिन्यात अनेक लग्नाचे मूहूर्त आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी होईल. अशातच महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. सोन्याचे दर आज १,३०,४८० रुपये प्रति तोळा आहेत. भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. परंतु आज तर सोन्याने उच्चांक गाठला आहे.मागच्या महिन्याभरातील हे सर्वाधिक दर आहेत. देशभरात सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १ लाख ३० हजारांच्या आसपास आहेत. जाणून घ्या आजचे भाव

सोन्याचे दर
१ तोळ्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांनी वाढले आहे.(expensive) हे दर १,३०,४८० झाले आहेत. २२ कॅरेटचे दर तोळ्यामागे ६०० रुपयांनी वाढले असून १,१९,६०० रुपयांवर विकले जात आहेत.१८ कॅरेटचे दर ४९० रुपयांनी वाढले आहेत. हे द ९७,८६० रुपये आहेत.

८ ग्रॅम सोन्याचे दर
आज ८ ग्रॅम सोन्याचे दर ५२८ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०४,३८४ रुपये झाले आहे.(expensive) २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचे दर ४८० रुपयांनी वाढले असून ९,६८० रुपयांवर विकले जात आहेत.१८ कॅरेटचे दर ८ ग्रॅममागे ३९२ रुपयांनी वाढले असून ७८,२८८ झाले आहेत.भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढच्या ५ वर्षात सोन्याचे दर हे डबलदेखील होऊ शकतात. त्यामुळे सोने खरेदी करणे ही एक चांगली गुंतवणूक आहेत. परंतु सोने खरेदीसाठीचे सध्याचे दरदेखील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीयेत. त्यामुळे सोनं घ्यायचं की नाही असा प्रश्न त्यांना पडलेला आहे.

हेही वाचा :

गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या

कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द

‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावाEdit