काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांना काँग्रेस पक्षातून(required) निलंबित करण्यात आलंय. त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आलंय. पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी डॉ. सिद्धू यांच्या वादग्रस्त विधानांनंतर ही कारवाई केलीय.पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी मुख्यमंत्री पदावरून वादग्रस्त विधान केलं होतं. जो कोणी ५०० कोटी रुपयांचा ‘सुटकेस’ देतात, ते मुख्यमंत्री होतात.

शनिवारी पत्रकारांशी बोलताना नवजोत कौर म्हणाल्या (required) की जर काँग्रेसने त्यांना पंजाबमध्ये पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले तर त्यांचे पती सक्रिय राजकारणात परत येतील. दरम्यान २०२७ मध्ये पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत.
यासह त्या म्हणाल्या की, त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाला देण्यासाठी पैसे नाहीत, परंतु ते पंजाबला “सुवर्ण राज्य” बनवू शकतात. “आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबितबद्दल बोलतो,” राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चालली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

कोणी पैसे मागितले आहेत का या प्रश्नावर त्या म्हणाल्या की कोणीही ते मागितले नव्हते,(required) परंतु जो ५०० कोटी रुपयांचा ‘सूटकेस’ देतो तो मुख्यमंत्री होतो. नवज्योत कौर सिद्धू यांच्या विधानावरून तेथील राजकारण तापलं . भाजप आणि आम आदमी पक्षाने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर टीका केलीय. हे काँग्रेसच्या कार्यपद्धतीचे “कुरूप सत्य” उघड झाले आहे.

हेही वाचा :

चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा

महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?

वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी