नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता संपूर्ण (together)राज्याला जिल्हापरिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच या निवडणुकीची घोषणा होणार आहे. ही बाब लक्षात घेता राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. सत्तेत बसण्यासाठी युती आणि आघाड्यांचे गणित आखले जात आहे. महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी त्या-त्या शहराची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतला जात आहे. दरम्यान, आता एक महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय गोटात तशा हालचाली वाढल्या आहेत. विशेष म्हणजे या गुप्त बैठकांचे काही फोटोदेखील समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर महापालिका(together) निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणाची शक्यता आहे. याच युतीवर चर्चा करण्यासाठी संभाजीनगरात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एक गुप्त बैठक झाली आहे. शरद पवार गटाचे ख्वाजा शरफोद्दीन आणि अजित पवार गटाचे अभिजित देशमुख यांनी एकत्र येत युतीसंदर्भात चर्चा केली आहे. बैठकीचे काही फोटोही बाहेर आले आहेत. एमआयएमला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आले पाहिजे असे अजितदादा गटाचे अभिजित देशमुख यांना वाटते. तर भाजपला दूर ठेवण्यासाठी चांगल्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असे मत शरद पवार गटाचे ख्वाजा शरफोद्दीन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजीनगरात एमआयएम या पक्षाचे मोठे प्राबल्य आहे.(together) त्यामुळेच महापालिका निवडणुकीत सत्तेचा सोपान मिळवायचा असेल तर एमआयएमला रोखणे गरजेचे आहे. यासह एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या पक्षाचीह चांगली ताकद छत्रपती संभाजीनगरात आहे. त्यामुळे सत्तेत यायचे असेल तर युती करणे हाच एक मार्ग असल्याचे येथील दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सध्या आता एक गुप्त बैठक झाली असून भविष्यात नेमके काय काय? होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नेमकी काय जादू होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!

सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान

१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट