नोव्हेंबर महिना उलटून आता डिसेंबरचे १३ दिवस गेले आहेत.(update)तरीही अजून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळाला नाही. लाभार्थी महिला या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. दरम्यान, येत्या ७ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे एकत्र येऊ शकतात.(update)पुढच्या ७ दिवसात म्हणजे २१ डिसेंबरआधी पैसे देण्याची शक्यता आहे. २० डिसेंबर रोजी २० नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान आहे. यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळणार आहेत.(update) ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लाभार्थी महिलांची तपासणी सुरु आहे. याअंतर्गत दर महिन्याला अनेक महिला अपात्र ठरतात. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटचे १७ दिवस उरले आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. त्यामुळे त्याआधी सर्व महिलांना केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर हे काम करावे, असं आवाहन आदिती तटकरेंनी केलं आहे.
हेही वाचा :
आज 12 तारीख आणि डिसेंबर महिना, ‘हा’ दिवस भाग्यवान का मानला जातो? जाणून घ्या
LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा
“महिलांनी झोपण्यापूर्वी टाळावीत ही ५ धोकादायक सवयी; आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम”