केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमध्ये कपात करण्याचा(vehicle)निर्णय घेतल्यानंतर ऑटोमोबाईल बाजाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसत आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही वाहनांच्या मागणीत घट न होता उलट वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वर्षानुवर्षे १८.७ टक्क्यांची वाढ नोंदवत नोव्हेंबरमध्ये एकूण ४ लाख १२ हजार ४०५ प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३ लाख ४७ हजार ५२२ प्रवासी वाहने विकली गेली होती.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स अर्थात(vehicle) सियामने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने नोव्हेंबरमध्ये १ लाख ७० हजार ९७१ प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. ही विक्री गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमधील १ लाख ४१ हजार ३१२ वाहनांच्या तुलनेत सुमारे २१ टक्क्यांनी अधिक आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या घाऊक विक्रीतही लक्षणीय वाढ झाली असून ती २२ टक्क्यांनी वाढून ५६ हजार ३३६ युनिट्सवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ह्युंदाई मोटर इंडियाने नोव्हेंबरमध्ये ५० हजार ३४० प्रवासी वाहनांची विक्री केली असून यात वर्षानुवर्षे चार टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
सणासुदीनंतरही टिकून राहिलेली मजबूत मागणी आणि सरकारच्या (vehicle)जीएसटी सुधारणांमुळे देशांतर्गत ऑटोमोटिव्ह उद्योगाने नोव्हेंबरमध्येही विक्रीचा वेग कायम ठेवला आहे. प्रवासी वाहने, दुचाकी तसेच तीनचाकी वाहनांनी नोव्हेंबरमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली आहे. धोरणात्मक सुधारणा, बाजारातील सकारात्मक वातावरण आणि ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास यामुळे २०२६ पर्यंत ही वाढ कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, वाहनांच्या निर्यातीतही मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या महिन्यात प्रवासी, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या निर्यातीत एकूण ९६.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रवासी वाहनांची निर्यात ३९.८ टक्क्यांनी वाढून ८४ हजार ६४६ युनिट्सवर पोहोचली आहे. कार निर्यातीत १८.३ टक्क्यांची वाढ होऊन ती ४० हजार ५१९ युनिट्सवर गेली आहे. दुचाकी वाहनांची निर्यात ३०.१ टक्क्यांनी वाढून ४ लाख ७१ हजार १२ युनिट्सवर पोहोचली असून तीनचाकी वाहनांच्या निर्यातीत तब्बल ९६.३ टक्क्यांची वाढ नोंदवत ती ४६ हजार १३ युनिट्सवर पोहोचली आहे.

देशांतर्गत बाजारातही दुचाकी वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला आहे.(vehicle) नोव्हेंबरमध्ये दुचाकी वाहनांची घाऊक विक्री १९ लाख ४४ हजार ४७५ युनिट्सवर पोहोचली असून ही विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी अधिक आहे. स्कूटर विक्रीत २९ टक्क्यांची वाढ होऊन ती ७ लाख ३५ हजार ७५३ युनिट्सवर पोहोचली आहे, तर मोटारसायकल विक्रीत १७.५ टक्क्यांची वाढ नोंदवत ती ११ लाख ६३ हजार ७५१ युनिट्सवर गेली आहे. एकूणच जीएसटी कपात, मजबूत मागणी आणि सकारात्मक धोरणात्मक वातावरणामुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सध्या ‘अच्छे दिन’ अनुभवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
हेही वाचा :
आज 12 तारीख आणि डिसेंबर महिना, ‘हा’ दिवस भाग्यवान का मानला जातो? जाणून घ्या
LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा
“महिलांनी झोपण्यापूर्वी टाळावीत ही ५ धोकादायक सवयी; आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम”