प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.(pension)दर महिन्याला पगारातील एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवतात. हे पैसे जर तुम्ही गुंतवले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या सरल पेन्शन योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. ही एक स्मॉल सेविंग स्कीम आहे. ही योजना एलआयसी म्हणजे सरकारी कंपनीद्वारे चालवली जाते. त्यामुळे योजनेत सुरक्षित परतावा मिळतो.एलआयसीच्या या योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे.

या योजनेत ४० ते ८० वयोगटातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. (pension)पती-पत्नी दोघे मिळूनदेखील योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेअंतर्गत एकदा गुंतवणूक करुन आयुष्यभर पैसे मिळवू शकतात. सेवानिवृत्तीनंतर तुमच्याकडे दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा होईल. तुम्ही सेवानिवृत्तीची ग्रॅच्युटी आणि पीएफ फंड या योजनेत गुंतवणूक करु शकतात. यामुळे तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे.

एलआयसी सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही ६ महिन्यात सरेंडर करु शकतात. (pension)या योजनेत डेथ बेनिफिटदेखील मिळतो. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला पैसे दिले जातात.एलआयसी सरल पेन्शन स्कीममध्ये दर महिन्याला कमीत कमी १२००० रुपयांची अॅन्युटी खरेदी करायची असते. यामध्ये गुंतवणूकीची कमाल मर्यादा निश्चित नाही. तुमच्या गुंतवणूकीवर आधारित तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. एकदा प्रिमियम भरल्यानंतर तुम्ही सहामाही, तिमाही किंवा महिन्याला पेन्शन घेऊ शकतात.एलआयसीच्या या योजनेत जर तुम्ही ३० लाखाची अॅन्युटी खरेदी केली तर तुम्हाला दर महिन्याला १२,३८८ रुपये मिळणार आहे. ४२ वर्षीय व्यक्तीने ३० लाख गुंतवल्यावर महिन्याला १२,००० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणार आहे. तुम्हाला आयुष्यभर ही पेन्शन मिळणार आहे. हा प्लान खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

हेही वाचा :

शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!

सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान

१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट