मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर मोठे भाष्य केले.(statement)मुंबई महापालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला वाटते की, कोणामध्ये फार काही नाराजी असेल असे मला वाटत नाही. ठीक आहे, कार्यकर्त्यांना वाटते की, जास्त संधी मिळाली पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचे आहे की, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं. मुंबई महापालिकेत विकासमुख आणि पारदर्शक शासन आणणं. त्याकरिताच आम्ही महायुतीचा निर्णय केला. कल्याण डोबिंवली महानगरपालिकेबद्दलही स्पष्ट बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले. भाजपामुळे शिंदे गट नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपा फक्त 55 जागांची मागणी का करेल?(statement)शेवटी भाजपा हा एक महत्वाचा पक्ष आहे. अशी अजून कुठलीही मागणी केली नाही. कल्याण डोबिंवलीत मागच्यावेळी आमच्या 42 जागा आल्या होत्या. त्यामुळे आम्ही तिथे प्रमुख पक्ष आहोत आणि तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत. एक शिवसेना आणि दुसरा भाजपा. बाकी तिसऱ्या पक्षाचे तिथे फार काही अस्तित्व नाहीये. आम्ही आपआपसात बसून तिथे जागा वाटप करू.

अजित पवार यांच्या विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, (statement)अनेकवेळा अजित पवार बोलतात… त्यावेळी लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात. पण मुळामध्ये ही जी योजना सुरू केलेली आहे. जी काही हुशार मुले आहेत, पण पीएचडीसाठीचा खर्च करू शकत नाही, त्या लोकांकरिता ती योजना काढली आहे. जर एका घरातील पाच लोक योजनेचा लाभ घेतील, तर इतर घरातील आपले जे गरीब लोक आहेत होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.

अजित पवारांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे. या प्रकरणात (statement)आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. यावेळी निवडणुका जिंकणे हाच आमचा फॉर्म्युला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती झाल्याने काही लोक नाराज असल्याची तूफान चर्चा रंगत होती, शेवटी देवेंद्र फडणवीसांनी त्यावर भाष्य केले.

हेही वाचा :

आज 12 तारीख आणि डिसेंबर महिना, ‘हा’ दिवस भाग्यवान का मानला जातो? जाणून घ्या

LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

“महिलांनी झोपण्यापूर्वी टाळावीत ही ५ धोकादायक सवयी; आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम”