थर्टीफर्स्टचा प्लान केलाय? सरत्या वर्षाला निरोप देताना अन् नव्या वर्षाचे स्वागत (Nationwide) करताना तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर आताच प्लान बदला. कारण, ३१ डिसेंबर रोजी फूड डिलिव्हरी आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्ससाठी ऑनलाइन डिलिव्हरीचे काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’नी देशव्यापी संपाचा इशारा दिलाय. त्यामुळे ऐनवेळी तुमची धावपळ होऊ शकते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्णय घेतलाय, त्यासाठी त्यांनी ३१ डिसेंबर २०२५ हा दिवस निवडलाय. या संपाचा परिणाम मेट्रो शहरांसह प्रमुख शहरांवर होण्याची शक्यता आहे.

३१ डिसेंबर २०१५ रोजी गिग वर्कर्स संपावर जाणार आहेत, (Nationwide)त्यामुळे वर्षाअखेर ऑनलाइन सेवांवर परिणाम होणार आहे. तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स यूनियन इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने बुधवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या विरुद्ध संपाचा इशारा दिलाय. स्विगी, झोमॅटो अन् झोप्टोसह इतर ठिकाणी काम करणारे कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी ऑनलाइन सेवा पूर्णपणे विस्कळीत अथवा ठप्प होऊ शकतात.

TGPWU आणि IFAT या संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. सण-उत्सव आणि मागणीच्या काळात डिलिव्हरी कामगार हे कणा असतात. पण त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. पण त्यांची कमाई खूपच कमी आहे. कामाचे तास जास्त आहेत, त्याप्रमाणात कर्मचाऱ्यांना मोबदला मिळत नाही. अनेकदा डिलिव्हरी ठिकाणे असुरक्षित असतात. गिग वर्कर्ससोबत काही ठिकाणी वागणूक चांगली मिळत नाही.

त्यांच्या मूलभूत सेवांकडे कुणीही लक्ष देत नाही, त्यामुळेच(Nationwide) हा संप पुकारण्यात येत असल्याचे संघटांनी आपल्या निवेदनात म्हटलेय.कामगारांचे कामाचे तास आणि काम याचा विचार करण्यात यावा. त्याशिवाय १० मिनिटांत ऑनलाइन डिलिव्हरी सेवा बंद करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे. कारण, यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात येते. अपघात विमा आणि सुरक्षा उपकरणे सुधारावीत. त्याशिवाय अनिवार्य विश्रांतीसाठी वेळ द्यावा, असेही संघटनांनी आपल्या निवेदनात म्हटलेय.

हेही वाचा :

महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!