पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे.(installment) आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते वितरित करण्यात आले असून, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. हा लाभ दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. नवीन वर्षात या योजनेचा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र त्याआधी केंद्र सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे. या नव्या अटींनुसार, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तयार करून तो योजनेशी लिंक करणे बंधनकारक असणार आहे. फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

शेतकरी योजनांमधील बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी (installment)आणि प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळतो याची अचूक माहिती मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडून फार्मर आयडी तयार करण्यात येत आहे. यालाच शेतकरी ओळखपत्र किंवा Farmer ID असे म्हणतात. हा शेतकऱ्यांचा एक डिजिटल प्रोफाइल आहे. यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, त्याच्याकडे असलेली जमीन, जमिनीचे क्षेत्रफळ, शेतातील सध्याचे पीक आणि इतर महत्त्वाची माहिती संग्रहित केली जाते. भविष्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या थेट लाभ योजनांसाठी हा आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
फार्मर आयडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम AgriStack Portal वर जाऊन (installment)युजर आयडी तयार करावा लागतो. त्यासाठी ‘Create New User’ या पर्यायावर क्लिक करावे. अटी व शर्ती स्वीकारून फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया पुन्हा एकदा करून ओटीपीने खात्री करावी लागते.यानंतर नवीन पासवर्ड तयार करून तो सेव्ह करावा. तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करावे.

लॉगिन झाल्यानंतर ‘Farmer Type’ या पर्यायात ‘Owner’ निवडावा. त्यानंतर ‘Fetch Land Detail’ या पर्यायावर क्लिक करून जमिनीचा खासरा क्रमांक आणि इतर जमीन संबंधित माहिती नोंदवावी. सर्व माहिती भरल्यानंतर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ‘Social Registry Tab’ उघडावा. येथे शेतकऱ्याला फॅमिली आयडी किंवा रेशन कार्डची माहिती भरावी लागेल. पुढे ‘Department Approval’ मध्ये ‘Revenue Department’ निवडावे. शेवटी ‘Consent’ वर टिक करून डिजिटल स्वाक्षरी करावी. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फार्मर आयडी तयार होतो.
हेही वाचा :
महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?
लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर
कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!Edit