जागतिक बाजारपेठेतील प्रचंड अस्थिरता आणि गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली (investors)अनिश्चितता यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे यावर्षी चांदीच्या दरवाढीने सोन्यालाही मागे टाकले असून, चांदीचे दर सोन्याच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढले आहेत. यामुळे सामान्य ग्राहकांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांचंच लक्ष या मौल्यवान धातूंवर केंद्रित झालं आहे. देशांतर्गत बाजारात चांदीचे दर प्रति किलो २ लाख ३५ हजार रुपयांच्या वर पोहोचले आहेत, तर सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १ लाख ४२ हजार रुपयांवर गेली आहे. काही मोजक्या व्यापार सत्रांमध्येच झालेली ही झपाट्याने वाढ बाजारासाठी आश्चर्यकारक ठरली आहे. त्यामुळे सध्या सोने-चांदी खरेदी करावी की थांबावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीमागे जागतिक भू-राजकीय घडामोडी हे मुख्य कारण आहे. (investors)व्हेनेझुएलातील तेल टँकरवर अमेरिकेने घातलेली नाकाबंदी, तसेच नायजेरियामध्ये इस्लामिक स्टेटविरोधात सुरू असलेल्या लष्करी कारवायांमुळे जागतिक पातळीवर तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखमीच्या पर्यायांपासून दूर जात सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात.याच सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोने आणि चांदीला मोठी मागणी मिळत आहे. परिणामी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने प्रति औंस ७५ डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून, सोन्याचा भाव ४,५५० डॉलर्स प्रति औंसच्या पुढे गेला आहे.

यावर्षी आतापर्यंत चांदीच्या किमतींमध्ये सुमारे १६० टक्क्यांची वाढ झाली आहे, (investors)तर सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे ८० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. म्हणजेच चांदीची दरवाढ ही सोन्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. यामागे केवळ गुंतवणूकच नाही, तर औद्योगिक मागणीही मोठं कारण ठरत आहे. सेमीकंडक्टर उद्योग, इलेक्ट्रिक वाहने, सौरऊर्जा प्रकल्प यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, त्या तुलनेत जागतिक स्तरावर चांदीचा पुरवठा अपेक्षित गतीने वाढलेला नाही. त्यामुळे मागणी-पुरवठ्यातील तफावत वाढून किमतींवर थेट परिणाम होत आहे.

हेही वाचा :

महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!Edit