मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी (government)महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, केवायसी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत केवायसी न झालेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या राज्यात निवडणुकांचा माहोल असून, नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत, तर जानेवारी 2026 मध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी केवायसी प्रक्रिया(government)अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीला ही मुदत 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत होती. मात्र, कमी वेळेत सर्व महिलांना केवायसी पूर्ण करणे शक्य नसल्याने शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती. तरीही मोठ्या संख्येने महिलांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे समोर आले. राज्यात सुमारे 45 लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची केवायसी अद्याप बाकी असल्याने शासनाकडे मुदतवाढीची मागणी होत होती. अखेर शासनाने ही मागणी मान्य करत केवायसीसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थी महिलांना 30 जानेवारी 2026 पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांची (government)मोठी प्रतीक्षा लागून राहिली आहे. डिसेंबर महिना संपत आला असतानाही अद्याप या दोन महिन्यांचे पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांची रक्कम जमा होणार आहे. यावेळी शासन नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी जमा करण्याची शक्यता आहे. तसेच पती आणि वडील दोघेही हयात नसलेल्या लाभार्थी महिलांसाठी स्वतंत्र माहिती संकलनासाठी एक विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. केवायसीसाठी मिळालेल्या मुदतवाढीमुळे आणि हप्ते लवकरच मिळण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा :
Sangli : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा
खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड
जेवताना रिल्स बघणं पडेल महागात, आत्ताच सोडा ही सवय