सरकारी कंपनीत नोकरी करायची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहेत.(attractive) भारतातील पब्लिक सर्विस ब्रॉडकास्टर म्हणजेच प्रसार भारतीमध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. प्रसार भारतीमध्ये मार्केटिंग विभागात काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी तुम्ही prasarbharati.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

प्रसार भारतीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (attractive)ही भरती रायपुर, जालंधर, पाटणा, मुंबई, भोपाळसह अनेक ठिकाणी होणार आहे. देशातील अनेक दूरदर्शन केंद्र, आकाशवाणी किंवा कमर्शियल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसमध्ये भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी १५ दिवसात अर्ज करायचे आहेत.प्रसार भारतीमध्ये एकूण १४ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी भरती दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. या नोकरीसाठी चैन्नई, हैदराबाद, मुंबई, कोलकत्ता येथे निवड झाल्यावर ३५००० ते ५०,००० रुपये पगार मिळणार आहे. इतर शहरांसाठी भरती झाल्यावर ३५,००० ते ४२००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए,(attractive) एमबीए मार्केटिंग किंवा पीजी डिप्लोमा मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणा्या उमेदवाराला कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश