भारतात ई-पासपोर्ट लाँच झाला आहे. सरकारच्या नव्या निर्णयाने पासपोर्टला (passports) आधुनिक आणि डिजिटल स्वरुप प्राप्त झालं आहे. ‘पासपोर्ट सेवा २.०’ कार्यक्रमाच्या अंतर्गत ही प्रक्रिया लाँच करण्यात आली आहे. या ई-पासपोर्टची फी, फायदे आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.ई-पासपोर्ट हा देखील साध्या पासपोर्टसारखाच असतो. ई-पासपोर्टच्या कव्हरच्या मागील बाजूस इलेक्ट्रॉनिक मायक्रोचिप असते. या चिपमध्ये फोटो, बोटांचे ठसे आणि वैयक्तिक माहिती डिजिटल स्वरुपात सुरक्षित असते. ही माहिती कोणालाही बदलता येत नाही.

ई-पासपोर्टची फी साध्या पासपोर्टसारखीचआहे. तुम्ही ३६ पानी (passports) बुकलेट ई-पासपोर्ट तयार करत असाल, त्याची १५०० रुपये इतकीच असेल. तेवढीच फी ही साध्या पासपोर्टसाठी आकारली जाते. तु्म्ही तत्काळ पासपोर्ट तयार करत असाल, तर तुम्हाला ३५०० रुपये मोजावे लागतील. यात १५०० रुपये फी आणि तत्काळ बनवण्याचे २००० रुपये जोडण्यात आले आहेत.

तुम्ही ५० पानी बुकलेट तयार करत असाल, तर तुम्हाला २००० रुपये फी द्यावी लागेल.(passports) तत्काळ पासपोर्ट मिळवण्यासाठी ४००० रुपये मोजावे लागतील.भारतात ई-पासपोर्ट काढण्याच्या पात्रता या साध्या पासपोर्टसारखी आहे. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिक पासपोर्ट काढण्यास पात्र ठरतो. लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्ती पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करू शकतो. ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तीला काही प्रकरणात प्राधान्य दिलं जातं.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश