रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध (launches) नव्या वर्षातही थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून सातत्याने प्रयत्न केले जात असले तरी त्याला यश आलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांसोबत अनेक बैठका घेतल्या, मात्र प्रत्यक्ष रणांगणावर परिस्थिती अधिकच चिघळताना दिसत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवून जगाचे लक्ष वेधले आहे.१२ जानेवारीच्या रात्रीपासून १३ जानेवारीच्या सकाळपर्यंत रशियाने युक्रेनच्या विविध भागांवर जोरदार हवाई हल्ले केले. शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रशियाने या हल्ल्यात एकूण २९३ ड्रोन(launches)आणि १८ क्षेपणास्त्रे युक्रेनकडे डागली. युक्रेनच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करत करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. सध्या युक्रेनमध्ये कडाक्याची थंडी असून वीज नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. २०२६ सालातील रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.या हल्ल्यांमुळे निवासी इमारतींसह विविध पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासही अडचणींचा सामना करावा लागला. या हल्ल्याने रशिया-युक्रेन संघर्ष अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हल्ल्यानंतर युक्रेनच्या वायू सेनेने अधिकृत निवेदन जारी करत (launches)परिस्थितीची माहिती दिली. रशियाकडून डागण्यात आलेल्या २९३ ड्रोनपैकी तब्बल २४० ड्रोन यशस्वीरित्या नष्ट करण्यात आल्याचे युक्रेनने सांगितले आहे. तसेच १८ क्षेपणास्त्रांपैकी ७ क्षेपणास्त्रेही हवेतच निष्क्रिय करण्यात आली.वायूसेना, मोबाईल फायटर ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणांनी समन्वय साधत ही कारवाई केली युक्रेनच्या या प्रतिकारामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टळले असले तरी काही भागांमध्ये हानी झाली आहे. या हल्ल्यानंतर आता युक्रेन रशियाला कशा स्वरूपात प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या युद्धामुळे शांततेसाठी सुरू असलेले सर्व प्रयत्न सध्या तरी निष्फळ ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश