या ईलेक्ट्रिक व्हेईकल कंपनीच्या स्टॉकने सोमवारी मोठी झेप घेतली.(returns) 1,621.50 कोटींचे मार्केट कॅप असलेली स्मॉल कॅप कंपनी ए-1 लिमिटेडचा स्टॉक पाच टक्क्यांनी वधारला. या कंपनीची उपकंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी A-1 Sureja Industries एकूण 1,425 युनिट्सचे दोन ऑर्डर मिळाले आहेत. हा कार्यादेश कमी गतिमान इलेक्ट्रिक टू व्हिलर्स वाहनांच्या पुरवठ्यासंदर्भात आहे. या कंपनीने पहिला कार्यादेश 12 जानेवारी 2026 रोजी Zipnova Enterprise LLP कडून मिळाला. त्यानुसार, 525 कमी गतीशील इलेक्ट्रिक मोटरसायकलचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर दुसरी ऑर्डर 14 जानेवारी 2026 रोजी Aayushman Engineering ने दिली आहे. यामध्ये 900 गमी गतिशील इलेक्ट्रिक दुचाकींचा पुरवठा करण्यात येणार आहे. या कंपनीने गेल्या सहा महिन्यात 100 टक्के परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

कंपनीनुसार, ही नवीन ऑर्डर A-1 Sureja Industries च्या सध्याची (returns)ऑर्डर अधिक मजबूत करते. याचा अर्थ या कंपनीला कमी गतिशील इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये कंपनीच्या उत्पादनांना बाजारात चांगली मागणी आहे आणि भविष्यात या उत्पादनांसाठी चांगला ग्राहक वर्ग आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये चांगली उसळी दिसून आली. कंपनी भविष्यात त्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकण्याची शक्यता आहे.

अक्षय ऊर्जा आणि शाश्वत संसाधने याकडे जगाचा ओढा वाढला आहे.(returns)याच दरम्यान A-1 Limited ने A-1 Sureja Industries मधील वाटा 45% हून वाढवून 51% इतका केला आहे. ही गुंतवणूक 100 कोटींच्या इंटरप्राईज व्हॅल्युशनवर आहे. कंपनी EV आणि यासंबंधीत क्षेत्रात रिसर्च, कंपोनेंट उत्पादनं आणि स्मार्ट चार्जिंगसंबंधीच्या विस्तारची शक्यता दिसत आहे. यामुळे बोनस आणि शेअर स्प्लिटविषयी लिक्विडिटी वाढली आहे. तर काही दिवसांपूर्वी A-1 Ltd ने 3:1 बोनस इश्यू पूर्ण केला आहे. यातंर्गत प्रत्येक एका शेअरवर तीन बोनस शेअर देण्यात आले. तर 10 रुपयांचा फेसव्हॅल्यू असलेल्या एका शेअरला एक रुपया फेस व्हॅल्यूच्या 10 शेअरमध्ये वाटले.कंपनीचा शेअर BSE वर दुपारी 12:51 वाजेपर्यंत 4.91% वा 1.65 रुपयांनी वधारुन 35.25 रुपयांवर व्यापार करत होता. या शेअरने गुंतवणूकदारांना अवघ्या सहा महिन्यात दामदु्प्पट परतावा दिला आहे. या शेअरने या काळात गुंतवणूकदारांना 111 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश