डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामुळे आणि आक्रमक (wealth) धोरणांमुळे सतत चर्चेत आहेत. टॅरिफ निर्णयांमुळे जागतिक पातळीवर खळबळ उडाली असतानाच, त्यांच्या वैयक्तिक संपत्तीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जानेवारी 2025 मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ट्रम्प यांच्या संपत्तीत अब्जावधी डॉलर्सची वाढ झाल्याचे अहवाल सांगतात.डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते त्यांच्या धोरणांमुळे अमेरिकेत तब्बल 18 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक आली आहे.

भारतासह अनेक देशांवर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेला मोठा (wealth) आर्थिक फायदा होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, या काळात केवळ अमेरिकाच नव्हे, तर ट्रम्प स्वतःही आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.अहवालानुसार, जानेवारी 2025 पासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत सुमारे 1.4 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम अंदाजे 13,000 कोटी रुपये इतकी होते. अचानक झालेल्या या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी चर्चा सुरू झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारतातही मालमत्ता असून पुण्यात (wealth) त्यांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक असल्याची माहिती समोर आली आहे.सध्या त्यांची एकूण संपत्ती सुमारे 7.3 अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्यांच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत सार्वजनिक नसल्याने प्रत्यक्षात ही संपत्ती यापेक्षाही जास्त असू शकते, असे काही अहवाल सांगतात.

हेही वाचा :

महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?

२४ लाख लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद