जगात फिरायला मिळणारे स्वातंत्र्य कोणा देशाच्या ताकदीचा मोठा संकेत बनू शकतो.(passport)याआधारे जारी झालेल्या Henley Passport Index 2026 च्या नव्या रँकींगने पुन्हा एकदा जागतिक ताकदीच्या संतुलनाचा आलेख सादर केला आहे. या वर्षी ही सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात ताकदवान पासपोर्ट म्हणून घोषीत केला आहे. म्हणजे ज्याच्याकडे सिंगापूरचा पासपोर्ट असेल त्या व्यक्तीला व्हिसा शिवाय १९२ देशांचा प्रवास करता येणार आहे. आशियाची वाढती ताकद या नव्या Henley Passport Index 2026 मध्ये दिसत आहे. सिंगापूर नंतर दुसऱ्या क्रमांकावर जपान आणि साऊथ कोरियाचा नंबर लागला आहे. या दोन्ही देशांच्या पासपोर्टना १८८ देशात व्हिसा फ्री एण्ट्री मिळत आहे. युरोपचे अनेक देश तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.तर संयुक्त अरब अमिराती गेल्या दोन दशकात ५७ व्या पायरीवर उडी मारत टॉप – ५ मध्ये गेला आहे. मात्र एकाच पायरीवर अनेक देश आहेत.

अमेरिका गेल्या वर्षीच्या घसरणीनंतर पुन्हा टॉप-१० मध्ये परतली आहे (passport)आणि १७९ देशात व्हिसा फ्री एण्ट्रीसह १० व्या स्थानावर पोहचली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनाडा आणि मलेशिया देखील टॉप – १० मध्ये जागा तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. याच्या उलट सर्वात कमजोर पासपोर्टच्या यादीत अफगाणिस्तान सर्वात खालच्या नंबरवर आहे. अफगाणिस्तानच्या पासपोर्टवाल्या व्यक्तीला केवळ २४ देशात विना व्हिसा प्रवेश मिळणार आहे.त्यानंतर सिरीया १०० व्या , इराक ९९ व्या , पाकिस्तान ९८ व्या , येमन आणि सोमालिया सारखे देश आहेत. रिपोर्टनुसार आज सर्वात मजबूत आणि सर्वात कमजोर पासपोर्टच्या दरम्यान १६८ देशांचे अंतर झाले आहे. साल २००६ मध्ये हे अंतर केवळ ११८ देशांचे होते.

पाकिस्तान ९८ व्या रँकमध्ये येऊन टॉप १०० मध्ये येण्यास यशस्वी झाला आहे.(passport) गेल्यावर्षी पाकिस्तान १०३ क्रमांवर होता. १० वर्षात पहिल्यांदा पाकिस्तान टॉप – १०० मध्ये आला आहे. रँकींग सुधारुनही पाकिस्तानच्या पासपोर्टने जास्त देशात व्हिसा फ्री जाता येत नाही. गेल्यावर्षी १०३ व्या क्रमांकावर असूनही पाकिस्तान पासपोर्टधारक ३३ देशाचा व्हिसा फ्री प्रवास करु शकतात. यावर्षी पाकिस्तानची रँक सुधारुन ९८ होऊनही त्याच्या पासपोर्टला ३१ देशांत व्हिसा फ्री प्रवेश आहे.म्हणजे उलट २ देश कमी झाले आहेत.

जागतिक पासपोर्टची क्रमवारी –

रँकींग देशाचे नाव किती देशात व्हिसा फ्री प्रवेश
1 सिंगापूर 192 देश
2 जापान, साऊथ कोरिया 188 देश
3 डेन्मार्क, लक्झमबर्ग, स्पेन, स्वीडन, स्विर्त्झलँड 186 देश
4 ऑस्ट्रिया, बेल्झियम, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयरलँड, इटली, नेदरलँड, नॉर्वे 185 देश
5 हंगेरी, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोवेनिया, यूएई 184 देश
6 क्रोएशिया, चेकिया, एस्टोनिया, माल्टा, न्यूझीलंड, पोलँड 183 देश
7 ऑस्ट्रेलिया, लातविया, लिकटेंस्टाईन, यूनायटेड किंगडम 182 देश
8 कॅनडा, आइसलँड, लिथुआनिया 181 देश
9 मलेशिया 180 देश
10 अमेरिका 179 देश

भारताची काय स्थिती ?
भारताचे साल २०२६ मध्ये Henley Passport Index 2026 मध्ये ८० वे स्थान गाठले आहे.(passport) जे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पायऱ्यावरती आहे. २०२५ मध्ये भारत ८५ व्या रँकवर होता. भारतीय पासपोर्ट धारकांना आता ५५ देशात व्हिसा फ्री वा व्हिसा ऑन अरायवल सुविधा मिळत आहे. ही सुधारणा भलेही छोटी असली तर यास सकारात्मक संकेत मानला जात आहे.

हेही वाचा :

महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?

२४ लाख लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद