कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून वैचारिक व्यभिचार सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय (indecent) दुकानदारी वाढली. मतदार खरेदी विक्री संघ उघडले गेले. निष्ठांची किंमत ठरवली जाऊ लागली. असंगाशी संग होऊ लागला.आणि त्याचे समर्थन केले जाऊ लागले. निषेदाचा आवाज क्षीण होऊ लागला.जे चांगले ते नासवले जाऊ लागले. आणि त्याचे कोणास काहीच वाटेनासे झाले. ठाण्यात साटेलोटे, मुंब्रा येथे रंगाचे राजकारण. आणि अमरावती येथे अभद्र युती. निवडणुकांनी राजकारणाचे आणि राजकारण्यांचे तीन तेरा करून टाकले आहेत. विभिन्न विचाराची मंडळी सत्तेसाठी एकत्र येत आहेत म्हटल्यावर राजकीय अराजकता येणारच आणि तशी स्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. मुंब्रा प्रभागातून सहार युनोसेक ही 22 वर्षाची युवती ठाणे महापालिकेवर निवडून आली आहे. तिचे वडील युनूस हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते. त्यांनी आपली मुलगी सहार हिच्यासाठी मुंब्रा प्रभागातून उमेदवारी मागितली होती,पण नकार मिळाला.

म्हणून मग सहार हिने एम.आय.एम.ची उमेदवारी घेतली आणि(indecent) ती निवडूनही आली. निवडून आल्यानंतर मात्र तिने जितेंद्र आव्हाड यांना डिवचले. येत्या पाच वर्षाचा संपूर्ण मुंब्रा परिसर “हिरवा” करून टाकणार असे धार्मिक तेढ वाढवणारे तिने वक्तव्य केले. तिच्या या चिथावणी देणाऱ्या वक्तव्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सहार शेख हिच्यावर कारवाई केली. सहारा शेख हिच्या चिथावणी खोर वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. सहार शेख हिच्या धार्मिक तेढ वाढवणाऱ्या वक्तव्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जवळपास 53 जागा जिंकल्या आहेत. स्वबळावरचा महापौर बनवण्यासाठी शिवसेनेने तिथे बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या भूमिकेमुळे सर्वाधिक संतप्त झालेले (indecent)आहेत ते म्हणजे संजय राऊत. त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ते आता विश्वासार्ह राहिलेले नाहीत असे म्हटले आहे. त्यांना खरे दुःख झाले आहे ते म्हणजे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचा. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे क्रमांक एकचे शत्रू एकनाथ शिंदे राहिलेले आहेत. “मिन्धे सेना”असे त्यांचे नामकरणच त्यांनी केले आहे. एक वेळ राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिले असते तर ते समजून घेतले असते अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. वास्तविक नवनिर्माण सेनेचे हे नगरसेवक निवडून आल्यानंतर काही तासात एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले होते. ही मंडळी केव्हाही फुटू शकतात हे लक्षात आल्यानंतर जी काही राजकीय प्रतिष्ठा शिल्लक आहे ती अबाधित राहावी असा विचार करून राज ठाकरे यांनी हे नगरसेवक फुटण्यापेक्षा शिंदे सेनेला पाठिंबा दिलेला बरा असा विचार केलेला असावा.

तिकडे अमरावतीमध्ये भलतेच काही घडले आहे. तिथे सत्तेवर येण्यासाठी (indecent)भारतीय जनता पक्षाने चक्क एम आय एम शी युती केली आहे. तिला अभद्र युतीचे म्हटले पाहिजे. कारण” एम आय एम”ही राजकीय संघटना धर्मांध आणि हिंदूंचा द्वेष करणारी आहे. अशा संघटनेवर बंदीच घातली पाहिजे अशी भूमिका यापूर्वी भारतीय जनता पक्षाने घेतली होती. या अभद्र युती बद्दल भारतीय जनता पक्षावर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती मोडून टाका असे म्हटले असले तरी, ही अभद्र युती करून भारतीय जनता पक्षाची जी अप्रतिष्ठा झाली आहे ती काही भरून निघणार नाही. एम आय एम ही संघटना स्थापन होऊन कितीतरी वर्षांचा काळ लोटून गेला आहे. हैदराबाद येथे स्थापन झालेला हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर खळबळ उडाली होती.

कारण एम आय एम म्हणजे दहशतवादी संघटना, पाकिस्तानच्या (indecent)आय एस आय संबंधित असलेली संघटना असे समजले जात होते. आज या संघटनेने महाराष्ट्रातील मालेगाव, भिवंडी येथे चांगलीच मुसंडी मारली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा जास्त जागा एम आय एम ने जिंकल्या आहेत. एमआय‌एमच्या वाढलेल्या जागांमुळे राजकीय नेते सुद्धा चकित झाले आहेत. मुस्लिम बहुल भागामध्ये ओवेसी यांच्या संघटनेला चांगले जनसमर्थन मिळत आहे. आणि म्हणूनच सहार यूनुस शेख या नवनिर्वाचित नगरसेविकेने येत्या पाच वर्षात मुंब्रा परिसर हिरवा करून टाकू. अशी गरळ ओकली आहे. हे भाजपासाठी आणि भाजपच्या सरकारसाठी सूचिन्ह नाही, असे म्हणावे लागते.

हेही वाचा :

महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?

२४ लाख लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद