‘मी, माजी आमदार संजय घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (history)अशी विधायक वळणावर युती झालेली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना साथ देऊन आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय सार्थ आहे हे दाखवून द्या.महाराष्ट्रात इतिहास निर्माण होईल, असा विजय घडवा’, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा येथील गहिनीनाथनगरच्या पटांगणात झाला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गावागावांत विकासाचे काम, (history) गोरगरिबांचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि जनतेच्या आशाआकांक्षा फलद्रूप व्हाव्यात, या एकाच इच्छेने आम्ही एकत्र आलो आहोत. कुणाला एकटे पाडण्यासाठी आम्ही तीन गट एकत्र आलेलो नाही. आमची तिघांची ही केवळ युती नाही तर नवी रणनीती आहे. ’समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘आमची ही युती कुणाला एकटे पाडण्यासाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहे. सोयीची राजकीय भूमिका घेणाऱ्यांचा व ज्या-त्या गटाशी प्रामाणिक राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा वेगळा विचार करण्याची वेळ आता आली आहे.’
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘युतीचा हा दिवस बघायला (history) दिवंगत विक्रमसिंह घाटगे असते तर धन्य झाले असते.’ यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजित पाटील, संचालक अंबरिशसिंह घाटगे, शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम, राजेंद्र भोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.स्वागत जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी केले. प्रास्ताविक विजय काळे यांनी केले. यावेळी वीरेंद्रसिंह घाटगे, नवीद मुश्रीफ, रणजितसिंह पाटील, युवराज पाटील, एम. पी. पाटील, नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, सूर्यकांत पाटील, कृष्णात पाटील, राजेखान जमादार, धनराज घाटगे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.
हेही वाचा :
महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?
राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?
२४ लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद