गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शाळांना 2 सप्टेंबरपर्यंत सुट्टी (holiday)जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी शाळा भरल्या आहेत. शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने शाळा पुन्हा बंद असतील. त्यातच शुक्रवारी ईद-ए-मिलाद असल्याने शाळांना सुट्टी असेल की नाही याबाबत काही पालकांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान 5 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद निमित्ता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये शाळा बंद राहणार आहेत.

5 आणि 6 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये शाळा बंद राहणार आहेत. ही सार्वजनिक सुट्टी असून, राष्ट्रीय सुट्टी नाही. 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणूनही साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्यातील शाळांचा सुट्ट्यांमध्ये ईदनंतरचा शुक्रवार, घटस्थापना, महाराजा हरि सिंह यांची जयंती आणि दुर्गा पूजा यांचा समावेश आहे.

ईद-ए-मिलाद, ज्याला पैगंबर मोहम्मद यांची जयंती म्हणूनही ओळखले जाते, 5 आणि 6 सप्टेंबरला साजरी केली जाईल. यानिमित्ताने दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील शाळा बंद राहण्याची अपेक्षा आहे.सिक्कीम आणि मणिपूरसारख्या काही ईशान्येकडील राज्यांमध्ये, हा सण इंद्रजत्राच्या दिवशीच येऊ शकतो, त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांनाही सुट्टी मिळू शकते.

ईद-ए-मिलाद हा मुस्लिमांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांना अनेकदा प्रश्न पडतो की, भारतात ही राष्ट्रीय सुट्टी आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. ईद-ए-मिलाद ही संपूर्ण देशभरात राष्ट्रीय सुट्टी नाही. त्याऐवजी, ही एक राजपत्रित सुट्टी आहे, याचा अर्थ केंद्र सरकार अधिकृतपणे दखल घेतं, परंतु सुट्टी प्रत्येक राज्यावर अवलंबून असते.

म्हणून, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू सारख्या काही राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये सहसा बंद राहतात. परंतु इतर राज्यांमध्ये, राज्याच्या निर्णयावर अवलंबून शाळा सुरु राहू शकतात.राज्य सरकारने मागील महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा आणि दहीहंडीनिमित्त दोन सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. या महिन्यातही राज्यभरात एक अतिरिक्त सुट्टी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही सुट्टी पुढल्या आठवड्यात म्हणजेच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. या सुट्टीसंदर्भात निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात आली आहे.

या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी राज्यभर श्रीगणेश विसर्जन आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी मुस्लीम समाजासाठी पवित्र असलेला ‘मोहम्मद पैगंबर’ यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी जुलूस काढला जातो. या शोभायात्रेला ‘ईद -ए-मिलादुन नबी’चा जुलूस असं म्हणतात. मात्र हिंदू-मुस्लीम एकोप्याच्या दुष्टीने अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी हा जुलूस काढण्याऐवजी हा जुलूस सोमवारी काढला जाणार आहे. त्यामुळेच सोमवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘ईद -ए-मिलादुन नबी’चे जुलूस 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याने या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी(holiday) जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा :

 LIC च्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर लागणार नाही GST
सरकारमध्ये राहूनही भुजबळ यांची भूमिका सरकार विरोधी
‘ही क्रीम लाव, गोरी होशील’, फसवणूक करणाऱ्या पतीने पत्नीला जिवंत जाळले