भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेकडून दबाव आणि धमकी येत असल्याचे आढळते. अनेक वर्षांचे भारत-अमेरिका संबंध टॅरिफच्या तणावाखाली आले आहेत.चीनमध्ये झालेल्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एका कारमध्ये 45 मिनिटांसाठी एकत्र प्रवास करताना दिसले. पुतिन यांनी पत्रकारांना सांगितले की, या प्रवासात त्यांनी अलास्कामधील बैठकीत काय चर्चा झाली यावर संवाद(Communication) साधला.

पुतिन आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती त्यांनी मोदी यांच्यासोबत शेअर केली. पुतिन यांनी सांगितले की, यूक्रेन युद्धाबाबत अमेरिका प्रयत्न करत आहे आणि या बैठकीत चर्चा याच विषयावर केंद्रित होती.अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावल्याने तणाव वाढला असून, नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद थांबवला आहे. ट्रम्प यांनी मोदींना तब्बल चार फोन केले, परंतु एकही फोनला उत्तर मिळाले नाही.

या घटनांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव, तर भारत-रशिया संबंध अधिक दृढ होत असल्याचे दिसते. पुतिन यांनी अमेरिकेकडून भारताला येणाऱ्या दबावावर शिष्टाचार शिकवला असल्याचेही वृत्त आहे.भारताने रशियाशी तेल व्यवहार सुरू ठेवण्याचे धोरण कायम ठेवले, तर अमेरिका आणि भारत यांच्यातील तणाव वाढत चालला आहे(Communication).

हेही वाचा :

5 सप्टेंबरला शाळांना सुट्टी आहे की नाही?
शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार चौकशी
 LIC च्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर लागणार नाही GST