टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू (cricketer)शिखर धवन अडचणीत सापडला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी त्याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅप ‘1xBet’ शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

ED कडून मिळालेल्या माहितीनुसार, धवनचा जबाब प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट अंतर्गत नोंदवला जाणार आहे. धवनचे नाव या अॅपशी जाहिराती किंवा प्रचाराच्या माध्यमातून जोडले गेल्याचा आरोप आहे. त्याचे नेमके संबंध काय आहेत हे तपासले जाणार आहे.
यापूर्वी या प्रकरणात माजी क्रिकेटपटू (cricketer)सुरेश रैना याचीदेखील चौकशी करण्यात आली होती. या अॅप्समुळे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून करचुकवेगिरीचे प्रकारही उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारने अलीकडेच वास्तविक पैशांशी संबंधित ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

शिखर धवनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत २३१५ धावा, वन डेत ६७९३ धावा आणि टी-२०त १७५९ धावा अशी त्याची कामगिरी आहे. आयपीएलमधील २२२ सामन्यांत त्याने ६७६९ धावा करून स्वतःची वेगळी छाप पाडली आहे.
हेही वाचा :
LIC च्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर लागणार नाही GST
सरकारमध्ये राहूनही भुजबळ यांची भूमिका सरकार विरोधी
‘ही क्रीम लाव, गोरी होशील’, फसवणूक करणाऱ्या पतीने पत्नीला जिवंत जाळले