वर्ष 2025 मध्ये अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी(cricketer) निवृत्ती घेतली आहे. नुकतंच टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि स्पिनर आर अश्विनने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून तसेच आयपीएलमधून सुद्धा निवृत्ती जाहीर केली. आता अजून एका भारतीय क्रिकेटरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या क्रिकेटरचं करिअर हे जवळपास 25 वर्षांचं राहिलं, मात्र आज अखेर त्याला पूर्णविराम लागला आहे.

अमित मिश्राने आयपीएलमध्ये 3 वेळा हॅट्रिक घेतली असून असं करणारा तो या फॉरमॅटमधला एकमेव गोलंदाज सुद्धा आहे. याशिवाय, त्याने भारतासाठी उत्तम गोलंदाजी देखील केली आहे. आता तो जगातील इतर टी-20 लीगमध्ये खेळू शकतो. 42 वर्षांच्या माजी लेग स्पिनर अमित मिश्राने न्यूज एजेंसी आईएनएसला सांगितलं की, ‘क्रिकेटमध्ये 25 वर्ष हे माझ्यासाठी खूप अविस्मरणीय राहिले. मी बीसीसीआय, प्रशासन, हरियाणा असोसिएशन, सपोर्ट स्टाफ, माझे सहकारी खेळाडू आणि माझ्या कुटुंबाचे मनापासून आभार मानतो. चाहत्यांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो’.

भारताच्या माजी क्रिकेटर (cricketer)अमित मिश्राच्या आंतरराष्ट्रीय करिअरबद्दल बोलायचं झाल्यास त्याने 22 टेस्ट, 36 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने टेस्टमध्ये 76, वनडेत 64 आणि टी 20 मध्ये 16 विकेट घेतले आहेत. अमितने 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याच वर्षी त्याने शेवटचा टेस्ट सामनाही खेळला होता. 2017 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. अमित मिश्राची क्रिकेट कारकीर्द सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठी राहिली, ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिनने 16 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटमधील कारकीर्द संपली, त्याची 24 वर्षांची होती. तर अमित मिश्राची कारकीर्द 25 वर्षांची राहिली.
हेही वाचा :
१६ वर्षांच्या मुलीवर नराधमांचा बलात्कार, दारू पिऊन बाटली टाकली गुप्तांगात
वडिलांनी घेतले हैवानाचे रूप; 250 गावकऱ्यांसमोरच मुलीच्या तोंडात…
महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral