पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एआय तंत्रज्ञानात आघाडीवर नेण्याचे (AI technology) आवाहन केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या काळात इयत्ता तिसरीपासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ‘भारत बोधन एआय कॉनक्लेव्ह २०२६’च्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. एआय इम्पॅक्ट समिटपूर्वी आयोजित करण्यात आलेली ही परिषद देशातील शिक्षणव्यवस्थेत एआयचा व्यापक वापर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.

आज सुरू झालेल्या या दोन दिवसीय (AI technology) परिषदेत शिक्षणतज्ज्ञ, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणकर्ते, स्टार्टअप्स, नवोपक्रम तज्ञ, वैज्ञानिक नेतृत्व आणि कौशल्य विकास क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. शिक्षणात एआयचे प्रभावी एकत्रीकरण कसे करता येईल, तसेच ‘भारत EduAI स्टॅक’ विकसित करण्यासाठी आवश्यक आराखडा काय असावा, यावर सखोल चर्चा होत आहे. देशाच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना बळकटी देत शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी भारताला (AI technology) एआय-सज्ज राष्ट्र बनवण्यावर भर दिला असून नैतिक, जबाबदार आणि सर्वसमावेशक एआयच्या विकासाची दिशा स्पष्ट केली आहे. भारताचे एआय मॉडेल रचनात्मकदृष्ट्या सर्वसमावेशक, तांत्रिकदृष्ट्या परस्पर-सुसंगत आणि क्षमतांच्या दृष्टीने स्वायत्त असेल, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि शिक्षकांना अधिक प्रभावी बनवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत एआयचा समावेश अपरिहार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी शिक्षण व्यवस्थेचे (AI technology) रूपांतर आवश्यक असल्याचे सांगत सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन विस्तारक्षम, जबाबदार, नैतिक आणि भारतकेंद्री एआय मॉेल्स विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले. या परिषदेतून होणारे सामूहिक चिंतन भारताची एआय क्षमता अधिक बळकट करेल, एआय क्षेत्रात भारताचे नेतृत्व प्रस्थापित करेल आणि सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यास मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?