Dubai हे शहर केवळ उंचच उंच इमारती, आलिशान (Dubai) जीवनशैली आणि सोन्याच्या बाजारासाठीच प्रसिद्ध राहिलेले नाही, तर आता ते जगभरातील खाद्यप्रेमींसाठीही मोठे आकर्षण ठरत आहे. पर्यटनासोबतच येथे फूड टुरिझम झपाट्याने वाढत असून विविध देशांच्या चवींचा संगम दुबईच्या रेस्टॉरंट्समध्ये अनुभवायला मिळतो. विशेषतः नॉनव्हेज पदार्थांची येथे प्रचंड रेलचेल असून पर्यटक दुबईला भेट दिल्यावर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मांसाहारी पदार्थ चाखल्याशिवाय परतत नाहीत.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये बीफला प्रीमियम आणि एग्झॉटिक (Dubai) श्रेणीत स्थान दिले जाते. हाय-एंड स्टेक हाऊस, लक्झरी हॉटेल्स आणि फाईन डायनिंग रेस्टॉरंट्समध्ये उत्कृष्ट दर्जाचे बीफ उपलब्ध असते. ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका येथून आयात केलेले बीफ येथे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते आणि सर्व उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र बंधनकारक असते. धार्मिक आहार नियमांचे काटेकोर पालन केले जाते. बीफ महाग असल्याने ते सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारात नसले तरी खास प्रसंगी ते आवडीने निवडले जाते.
सागरी किनारपट्टी लाभलेल्या संयुक्त अरब (Dubai) अमिरातीमध्ये सी-फूडलाही तितकेच महत्त्व आहे. ताजी मासळी, कोळंबी आणि उच्च प्रतीचे सागरी अन्न मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. सालमन, हम्मौर आणि किंग फिश यांसारख्या माशांना मोठी मागणी आहे. वाढत्या मागणीमुळे मत्स्यपालन क्षेत्राचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. अनेकांच्या आहारात सी-फूड हे रेड मीटचा पर्याय बनत असल्याचे चित्र दिसते.
मटणालाही येथे पारंपरिक आणि धार्मिक महत्त्व आहे. सण-उत्सव, कौटुंबिक समारंभ आणि (Dubai) विशेष प्रसंगी मटणाचे पदार्थ हमखास तयार केले जातात. स्थानिक बकऱ्यांचे मांस उपलब्ध असले तरी चव आणि दर्जामुळे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधून आयात होणाऱ्या मटणाला अधिक पसंती दिली जाते. स्थानिक आणि आयात अशा दोन्ही मार्गांनी मटणाची मागणी पूर्ण केली जाते.
मात्र सर्व प्रकारच्या मांसाहारी (Dubai) पर्यायांमध्ये सर्वाधिक दबदबा चिकनचा आहे. परवडणारी किंमत, सहज उपलब्धता आणि उच्च प्रोटीनमुळे चिकन हे सर्वसामान्यांपासून ते प्रीमियम ग्राहकांपर्यंत सर्वांचे आवडते आहे. मीट मार्केटमध्ये जवळपास ८० टक्क्यांपर्यंत चिकनचा वाटा असल्याचे विविध बाजार अहवाल दर्शवतात. आरोग्यदायी, कमी चरबीयुक्त आणि प्रथिनयुक्त पर्याय म्हणून चिकनकडे पाहिले जाते. त्यामुळे बीफ, मटण आणि सी-फूडची लोकप्रियता असली तरी दुबईसह संपूर्ण देशात चिकनचे वर्चस्व कायम आहे.
आगामी काळात संयुक्त अरब (Dubai) अमिरातीतील मांस उत्पादन क्षेत्रात सातत्याने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसंख्येतील वाढ, विविध संस्कृतींची उपस्थिती आणि हलाल उत्पादनांची वाढती मागणी यामुळे दुबई, अजमान आणि शारजाहसारख्या शहरांमध्ये मांसाहारी पदार्थांची विविधता आणखी वाढताना दिसत आहे. खाद्यसंस्कृतीचा हा विस्तार दुबईला केवळ पर्यटननगरी नव्हे तर जागतिक फूड हब म्हणूनही ओळख निर्माण करून देत आहे.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?