रिलायन्स जिओ(Jio) 5 सप्टेंबर 2025 रोजी 10 व्या वर्षात प्रवेश करतंय. 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिओचे सर्वसर्वा आकाश अंबानी यांनी 50 कोटी ग्राहकांसाठी तीन खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये वीकेंड, मासिक आणि वार्षिक सेलिब्रेशन प्लॅन्स समाविष्ट आहेत. तुम्ही जिओ ग्राहक असाल तर यात तुम्हाला अनलिमिटेड डेटा आणि मनोरंजनाचे फायदे मिळतील.

5 ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान सर्व 5G ग्राहकांना त्यांच्या प्लॅननुसार अमर्यादित 5G डेटा मोफत मिळणार आहे. 4G स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी 39 रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकद्वारे दररोज 3GB 4G डेटा उपलब्ध असेल, ज्यामुळे सर्व ग्राहकांना वर्धापन दिनाचा आनंद घेता येणार आहे.

349 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या आणि 2GB/दिवस किंवा त्याहून अधिक डेटा असलेल्या दीर्घकालीन प्लॅन असलेल्या ग्राहकांना 5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान अमर्यादित 5G डेटा मिळेल. यासोबत Jio Hotstar, Jio Saavn Pro चे 1 महिन्याचे सबस्क्रिप्शन, Zomato Gold चे 3 महिने, Netmeds First चे 6 महिने आणि Jio Home चा 2 महिन्यांचा मोफत ट्रायल मिळेल. कमी किंमतीच्या प्लॅन असलेले ग्राहक 100 रुपयांचा पॅक जोडून हा लाभ घेऊ शकतात.

349 रुपये किंवा त्याहून जास्त किंमतीच्या 12 मासिक रिचार्ज पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना 13 वा महिना मोफत मिळेल. यामध्ये त्यांना त्यांच्या नियमित प्लॅनमधील सर्व सुविधा विनामूल्य मिळतील, ज्यामुळे दीर्घकालीन ग्राहकांना विशेष फायदा होईल.

नवीन जिओ(Jio) होम कनेक्शनसाठी 5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान 1200 रुपयांत 2 महिन्यांचे कनेक्शन उपलब्ध आहे. यामध्ये 1000+ टीव्ही चॅनेल, 30 एमबीपीएस अमर्यादित डेटा, 12+ OTT अॅप्स (Jio Hotstar सह), Wi-Fi 6 राउटर, 4K सेट टॉप बॉक्स, 2 महिन्यांचा Amazon Prime Lite, 2% अतिरिक्त Jio Gold आणि 3000 रुपयांचे व्हाउचर मिळतील. www.jio.com वर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.

जिओच्या वीकेंड ऑफर अंतर्गत सर्व 5G ग्राहकांना 5 ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान त्यांच्या प्लॅननुसार अमर्यादित 5G डेटा मोफत मिळेल. तसेच, 349 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या आणि 2GB/दिवस किंवा त्याहून अधिक डेटा असलेल्या दीर्घकालीन प्लॅन असलेल्या ग्राहकांना 5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान अमर्यादित 5G डेटा मिळेल.

मासिक सेलिब्रेशन ऑफर अंतर्गत, 349 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या प्लॅन असलेल्या ग्राहकांना Jio Hotstar आणि Jio Saavn Pro चे 1 महिन्याचे सबस्क्रिप्शन, Zomato Gold चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन, Netmeds First चे 6 महिन्यांचे सबस्क्रिप्शन आणि Jio Home चा 2 महिन्यांचा मोफत ट्रायल मिळेल. तसेच, Jio Finance वर 2% अतिरिक्त डिजिटल गोल्ड आणि 3000 रुपयांचे सेलिब्रेशन व्हाउचर मिळेल.

5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान, 1200 रुपयांत 2 महिन्यांचे जिओ होम कनेक्शन मिळेल. यामध्ये 1000+ टीव्ही चॅनेल, 30 एमबीपीएस अमर्यादित डेटा, 12+ OTT अॅप्स , Wi-Fi 6 राउटर, 4K सेट टॉप बॉक्स, 2 महिन्यांचा Amazon Prime Lite, 2% अतिरिक्त Jio Gold आणि 3000 रुपयांचे सेलिब्रेशन व्हाउचर समाविष्ट आहे.

हेही वाचा :

ओबीसी समाजाच्या १४ पैकी १२ मागण्या केल्या मान्य
तीन मुस्लिम पती, एक लिव-इन पार्टनर…मग पुन्हा हिंदू मुलासोबत लग्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्या कारमध्ये 45 मिनिट काय घडले…