भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधांमध्ये गेल्या काही आठवड्यांत मोठे (Trade relations) चढउतार पाहायला मिळाले. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के आयात शुल्क लावल्याची घोषणा केली होती. यामध्ये 25 टक्के दंडात्मक टॅरिफचा समावेश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. या निर्णयामागे भारताने रशिया कडून सुरू ठेवलेली तेल खरेदी हे प्रमुख कारण असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर भारताने विविध देशांसोबत मुक्त व्यापार करारांना गती दिली. अमेरिकेच्या दबावाला झुकता माप देणार नसल्याचा संदेश भारताने अप्रत्यक्षपणे दिला. मात्र अचानक घडामोडीत अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 50 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के करण्याची मोठी घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव काही प्रमाणात कमी झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक (Trade relations) व्यापार करारावर सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या करारातील तांत्रिक बाबींवर काम सुरू असून मार्च महिन्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कराराच्या बदल्यात भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास मान्यता दिल्याचा दावा काही तज्ज्ञांकडून केला जात होता. त्यामुळे भारत भविष्यात रशियन तेल खरेदी करणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री Marco Rubio यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेने भारताकडून अतिरिक्त रशियन तेल खरेदी रोखण्याबाबत भूमिका घेतली आहे. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा घेतला जात आहे की, भारत सध्या ज्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतो, तेवढी खरेदी सुरू ठेवू शकतो; मात्र त्यापेक्षा अधिक खरेदीवर निर्बंध असू शकतात.
भारताकडूनही यावर स्पष्ट भूमिका मांडण्यात (Trade relations) आली आहे. भारताने ठामपणे सांगितले की, देशातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात ऊर्जा उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भारत कोणत्याही देशाकडून, राष्ट्रीय हित लक्षात घेऊन, तेल खरेदी करू शकतो आणि त्यावर बाह्य दबाव स्वीकारला जाणार नाही.
या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठ, भू-राजकीय समीकरणे आणि भारत-अमेरिका संबंध यांच्यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता मार्चमध्ये होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली