सध्या भारतात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असून सर्वसामान्य नागरिकांसाठी सोने (gold) खरेदी करणे अधिकच अवघड झाले आहे. अशातच सोशल मीडियावर सौदी अरेबियातील एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाकडून उपस्थित पाहुण्यांना २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे वाटली जात असल्याचा दावा केला जातो. काहींनी हे खरे सोने असल्याचे म्हटले, तर काही युजर्सनी ते सोन्यासारख्या फॉइलमध्ये गुंडाळलेले लक्झरी चॉकलेट्स असल्याचे सांगितले. या व्हिडीओनंतर एकच प्रश्न उपस्थित झाला—सौदी अरेबियाकडे इतके सोने येते कुठून?

सौदी अरेबिया म्हटले की (gold) डोळ्यांसमोर तेलाच्या विहिरी आणि अथांग वाळवंट उभे राहते. मात्र गेल्या काही वर्षांत या देशाने सोन्याच्या साठ्यांमुळेही जागतिक स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. World Gold Council च्या ताज्या अहवालानुसार, सौदी अरेबियाकडे सुमारे ३२३.१ टन सोन्याचा साठा आहे. या साठ्यामुळे तो अरब देशांमध्ये अव्वल स्थानावर असून जागतिक केंद्रीय बँकांच्या यादीतही टॉप २० मध्ये गणला जातो.
सौदी अरेबियातील सोन्याचे (gold) महत्त्व केवळ आयातीपुरते मर्यादित नाही. देशाच्या पश्चिम भागातील ‘अरेबियन शील्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूभागात मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणी आहेत. सरकारी खनन कंपनी Ma’aden या खाणींचे संचालन करते. ‘मद अद दहब’ म्हणजेच ‘सोन्याचे पाळणे’ म्हणून ओळखली जाणारी खाण हजारो वर्षांपासून कार्यरत आहे. याशिवाय ‘अम अरीद’ आणि ‘मंसूरा-मसरह’ या आधुनिक खाणींमुळे देशातील उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. अलीकडेच मक्का प्रांतातील अल खुरमा परिसरात आणि मंसूरा-मसरह खाणीच्या आसपास नवीन सोन्याचे साठे सापडल्याची घोषणा करण्यात आली. प्राथमिक तपासणीत येथे प्रती टन अयस्कात लक्षणीय प्रमाणात सोने असल्याचे आढळले आहे.
तज्ञांच्या मते, सौदी अरेबियाचे सोन्याचे बळ (gold) केवळ खाणीतून येत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातून खरेदीमुळेही वाढते. देशाची केंद्रीय बँक आपल्या परकीय चलन साठ्यात विविधता आणण्यासाठी नियमितपणे सोने खरेदी करते. तेलावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला पर्याय देण्यासाठी सौदी अरेबिया ‘व्हिजन 2030’ अंतर्गत मोठ्या आर्थिक सुधारणांवर काम करत आहे. या धोरणाचा भाग म्हणून सोन्याचा साठा वाढवणे हा दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणूनच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खरा असो वा नसो, सौदी अरेबियाकडे मोठ्या प्रमाणात सोने उपलब्ध असण्यामागे भक्कम खनिज संपत्ती, आधुनिक खनन प्रकल्प आणि जागतिक बाजारातील सक्रिय खरेदी ही तीन प्रमुख कारणे आहेत. तेलासोबतच सोनेही आता या वाळवंटी देशाच्या आर्थिक बळकटीचा महत्त्वाचा आधार बनत आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली