भारतीय संस्कृतीत सोने हा केवळ दागिन्यांचा धातू नसून समृद्धी आणि (Indian culture) प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा इतर आनंदाच्या क्षणी सोन्या-चांदीची खरेदी करण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. अशातच आज सोन्या-चांदीच्या किमतीत दिलासा देणारी घसरण पाहायला मिळाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या (Indian culture) दरात तब्बल 1 हजार 100 रुपयांची घट नोंदवली गेली. चांदीच्या किमतीत तर मोठी घसरण होत तब्बल 10 हजार रुपयांनी दर खाली आले. सततच्या वाढीनंतर आलेल्या या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आज जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 59 हजार 135 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर आला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरातील ही घसरण खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरत आहे. आगामी सणासुदीच्या काळात या दरांचा बाजारावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं