भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर अमेरिका(imposed) आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत, त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ज्याचा परिणाम हा भारतावर होणार आहे. टॅरिफनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा दणका, केली मोठी घोषणा, टेन्शन वाढलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो हे कारण पुढे करत अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. याचदरम्यान आता भारताचं टेन्शन वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे, व्हिसाचे नियम आता आणखी कडक करण्यात आले आहेत.

नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी साठी अर्ज करणाऱ्यांना आता त्यांच्याच देशात किंवा कायदेशीर निवासस्थानात मुलाखतीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, अमेरिकेच्या या नव्या नियमामुळे आता अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. भारतीयांना आता इतर देशांच्या मदतीने अमेरिकेची अपॉइंटमेंट तातडीनं घेता येणार नाहीये.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं सहा डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत वेबसाइटवर म्हटलं आहे की, तत्काळ प्रभावाने हा नियम लागू झालेला आहे. नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आम्ही नियमांमध्ये बदल केले आहेत. नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी साठी अर्ज करणाऱ्यांना आता त्यांच्याच देशात किंवा कायदेशीर निवासस्थानात मुलाखतीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.
असं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान नॉन-इमिग्रंट व्हिसा हा असा व्हिसा आहे, ज्या द्वारे तुम्हाला अस्थायी उद्देशासाठी अमेरिकेत एन्ट्री मिळू शकते, जसं की, (imposed)पर्यटन, व्यवसाय, मेडिकल ट्रीटमेंट इत्यादीसाठी. या व्हिसाच्या मदतीने तुम्हाला कायम स्वरुपी अमेरिकेत राहाता येत नाही, कारण त्याचा एक निश्चित असा कालावधी असतो.

अमेरिकेच्या या नव्या नियमाचा अर्थ असा आहे की, आता भारतीय नागरिक दुसऱ्या देशाच्या मदतीनं तातडीनं बी1 (व्यावसायिक) आणि बी2 (पर्यटक) व्हिसासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकणार नाहीत. कोरोना काळामध्ये अमेरिकेच्या व्हिसासाठी अपॉइंटमेंट मिळावी यासाठी भारतात तब्बल तीन वर्षांची वेटिंग होती, अशा परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक दुसऱ्या देशाच्या मदतीनं अपॉइंटमेंट घेऊन तातडीनं व्हिसा घ्यायचे मात्र आता हे सर्व बंद होणार आहे.(imposed) अमेरिकेनं तात्काळ प्रभावाने हा नियम लागू केला आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार?
नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!
दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक