आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी(remove) काळ्या मिठाचे सेवन करावे. उपाशी पोटी काळ्या मिठाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचलेली घाण बाहेर पडून जाते.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले शौच बाहेर पडून जाण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा काळ्या मिठाचे सेवन

दैनंदिन आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते.(remove) हे पदार्थ शरीराला पोषण देतात. जेवणात नियमित खाल्लेल्या पदार्थांमधून पोषण आणि ऊर्जा मिळते. पण खाण्याच्या पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे खाल्ले पदार्थ आतड्यांमध्ये दीर्घकाळ तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेले घाणेरडे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये मल चिकटून राहतात, जो सहज बाहेर पडून जात नाही. शरीरात साचून राहिलेल्या घाणीमुळे वेगवेगळ्या आजारांची लागण शरीराला होते. यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि थकवा, सुस्ती, त्वचेवर पुरळ, चेहऱ्याची चमक कमी होणं, डोकेदुखी, सततची बद्धकोष्ठता, मूळव्याध इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाणे आवश्यक आहे.
Gym न करता पोटावरील चरबी होईल कायमची गायब! सकाळी उठल्यानंतर(remove) नियमित करा ‘ही’ कामे, वितळून जाईल चरबी
आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. फॅटी लिव्हर, किडनी खराब होणे, त्वचेवर सतत पिंपल्स येणे किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यासाठी काळ्या मिठाचे कशा पद्धतीने सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. काळे मीठ शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करते. याशिवाय उपाशी पोटी काळ्या मिठाच्या पाण्याचे सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.
आतड्यांमध्ये घाण साचून राहण्याची कारणे:
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन न केल्यामुळे आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते. सतत जंक फूड, तेलकट, तिखट, प्रक्रिया केलेले पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते. या घाणीमुळे आरोग्य बिघडते. आतड्यांमध्ये साचून राहिलेला मल बाहेर पडून गेला नाहीतर चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, पुरळ, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोट फुगण्याची समस्या उद्भवते.
आतड्या स्वच्छ करण्यासाठी उपाय:
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. आतड्यांमधील घाण बाहेर पडून गेल्यानंतर रक्त शुद्ध राहते, पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कायमच निरोगी राहते. पचनक्रिया कायमच निरोगी राहिल्यास मूड चांगला राहतो, मेंदूचे कार्य सुधारते आणि तणाव कमी होतो.
पाय आणि कंबर सतत दुखते? किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध
काळ्या मिठाचे सेवन कसे करावे?
आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात काळे मीठ आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. हे पाणी उपाशी पोटी नियमित प्यायल्यास आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाईल. काळे मीठ चवीला अतिशय खारट असते. त्यामुळे काळ्या मिठाचा वापर अतिशय कमी प्रमाणात करावा.
हेही वाचा :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार?
नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!
दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक