अभिनेते नाना पाटेकर नुकतेच हाऊसफुल ५ या बॉलीवूड चित्रपटामध्ये दिसले होते. या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. गेली अनेक दशकं मराठी चित्रपटांसह(film) अनेक हिंदी चित्रपटामध्येही काम केलं आहे. अभिनयाची छाप वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर कोरली आहे. नाना पाटेकर अनेक सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय असतात. त्यातीलच एक म्हणजे नाम फाऊंडेशन. नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यात बोलताना नानांनी त्यांच्या आयुष्यातील मोठी घोषणा केली आहे. नानांना अभिनयातून निवृत्ती घ्यायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यत्त केली आहे.

रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नानांनी उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधला आहे. यावेळी बोलताना नानांनी निवृत्ती घेण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. नाना म्हणाले, “आजवर मी खूप काम केलं आता मला मनासारखं जगावं असं वाटतंय.1 जानेवारीला मी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीन. त्यानंतर नाटक, सिनेमातून(film) निवृत्त होऊन गावखेड्यांतील विवंचना समजून घ्याव्यात आणि त्यांच्यासाठी काही करावं, असं मला वाटत आहे.”

नाना पुढे म्हणाले, “पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं असे वाटते आहे. ज्यातून तुम्हाला खूप काही सांगता येईल अशी एखादी छान कलाकृती वाट्याला आली तर ती मी नक्कीच करेन पण आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या”. असे नाना पाटेकर म्हणाले आहेत.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मिळून ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. या नाम फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बोलताना नाना म्हणाले, “ही धुराही आता मकरंदनेच पुढे न्यावी. कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच. नामची पुढची पिढी उत्तम पद्धतीने आमचे काम पुढे नेत आहे. कामाची व्याप्ती खूप वाढली आहे. आता नामचं पुढील काम मकरंद ठरवेल. मी असेन तरच काम करीन ही त्याची भूमिका चुकीची आहे. नामसारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या, तरी समस्या सुटणार नाही.”

हेही वाचा :

सांगलीत स्पेशल-26! डॉक्टराच्या घरातून काही मिनिटांत लंपास केले कोट्यवधींचं सोनं अन् रोकड

 पत्नीची निर्घृण हत्या, पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…

पुढची 10 वर्ष ‘या’ नोकऱ्याच टिकणार! AI च्या जगात दरमहा कमवाल लाखो रुपये