लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नव्या ट्विस्टसह सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत(series) एका राजस्थानी कुटुंबाची एंट्री झाली असली, तरी प्रेक्षक अजूनही दयाबेनच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी गेल्या सात वर्षांपासून मालिकेत दिसली नाही. तिच्या मुलीच्या जन्मानंतर ती शोपासून दूर आहे. दरम्यान, मालिकेत(series) तिचा भाऊ सुंदर साकारणारा मयूर वाकानीनं दयाच्या अनुपस्थितीबाबत उलगडा केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना मयूर म्हणाला, “मी तिच्या प्रवासाला जवळून पाहिलं आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि विश्वासाने काम करता, तर देवाचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. तिच्या मेहनतीमुळेच प्रेक्षकांनी तिला दयाबेनच्या भूमिकेत इतकं प्रेम दिलं. मात्र सध्या ती खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावत आहे आणि ती यात पूर्णपणे रमली आहे.”
मयूर पुढे म्हणतो, “आमच्या वडिलांनी आम्हाला कायमच योग्य शिकवण दिली. जीवनात जी भूमिका येते, ती प्रामाणिकपणे साकारावी लागते. दिशा सध्या आई म्हणून जबाबदारी पार पाडत आहे आणि ती त्यात पूर्णपणे एकरूप झाली आहे.”
काही महिन्यांपूर्वी शोचे निर्माते असित मोदी यांनीही दिशा वाकानीबाबत प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “लग्नानंतर महिलेच्या जबाबदाऱ्या वाढतात. मी तिची आजही वाट पाहतो आहे. ती मालिकेत परतली तर उत्तम आहे, पण नाही आली तर मला दुसरी दयाबेन शोधावी लागेल.”
प्रेक्षकांमध्ये आजही दिशा वाकानी परतण्याची आशा आहे. मात्र ती खरोखरच शोमध्ये पुनरागमन करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 8 धडाकेबाज निर्णय
टीम इंडियाला मिळाला नवा जर्सी स्पॉन्सर, प्रत्येक मॅचसाठी देणार एवढे कोटी