उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मुलाच्या शाळेत अर्जावर सही करण्यासाठी गेलेल्या वडिलांचा(Father) शाळेच्या परिसरातच अचानक मृत्यू झाला.अतर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरवा गावातील रहिवासी सुरेश हे आपल्या मुलाच्या नवोदय शाळेत अर्जावर सही करण्यासाठी गेले होते. सही करत असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना प्रचंड घाम आला आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेमुळे शाळेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

शाळेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने सुरेश यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.मटौंध पोलीस ठाण्याचे एसओ संदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार सुरेश(Father) यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाला असावा. तथापि, नेमकं कारण पोस्टमार्टेम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

या अचानक झालेल्या घटनेमुळे सुरेश (Father)यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “मुलाच्या शाळेत किरकोळ कामासाठी गेलेल्या सुरेश यांचा असा अकाली मृत्यू होईल, हे स्वप्नातही वाटलं नव्हतं,” असे सांगत कुटुंबीयांनी हळहळ व्यक्त केली.या घटनेमुळे स्थानिक गावकऱ्यांसह शाळेच्या प्रशासनालादेखील मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :
निर्वस्त्र हायवेवर फेकून दिलं, डॉक्टरचं विकृत कृत्य
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता H-1B Visa धारकांना दणका!
‘वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा’; अजित पवार कोणावर कडाडले?