कोल्हापुरात माजी उपसरपंचाची ग्रामपंचायतीत घुसून लिपिकाला मारहाण  CCTV त घटना कैद

कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातील कौलव ग्रामपंचायतीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतच्या मालकीच्या गाळ्याचे भाडे मागितल्याने माजी उपसरपंचाकडून लिपिकाला मारहाण करण्यात आली आहे. इमारहाड ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. ग्रामपंचायत येथील माजी पदाधिकाऱ्याकडून असा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कोल्हापूरच्या(Kolhapur) कौलव ग्रामपंचायतीत लिपिक सागर पाटील याला माझी उपसरपंच अजित पाटील यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ग्रामपंचायतच्या गाळ्याचे भाडे मागितल्याने माजी उपसरपंचाने लिपिकालाच मारहाण केली. ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक सागर पाटील काम करत असून त्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्याचे भाडे मागितले होते.

यावरून माजी उपसरपंच अजित पाटील यांनी संतापून लिपिकाला बेदम मारहाण केली. माजी उपसरपंचाकडून झालेली ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेची सध्या गावात चांगलीच चर्चा असून ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कायदा हातात घेतला जात असेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं असा सवाल उपस्थित होत आहे.

ग्रामपंचायतच्या मालकीच्या गाळाचे भाडे मागितल्यानंतर माजी उपसरपंच अजित पाटील संतापाने थेट कार्यालयात घुसले. त्यांनी लिपिक सागर पाटीलला मारहाण केली. नंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. या घटनेची साधी पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीच्या गाळ्याचे भाडे मागितल्याने माजी उपसरपंचाने कार्यालयात येऊन केलेल्या मारहाणीनंतर माजी उपसरपंच अजित पाटीलवर काही कारवाई होणार की नाही? हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदाराला चांगलाच दम दिला आहे. मंत्री बावनकुळेंचा दम देतानाचा हा व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमांवर व्हायरल होतोय. जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी एकट्या चांदवडच्या तहसीलदार विरोधात आल्याने महसूलमंत्री बावनकुळे यांनी फोनवरुन तहसीलदाराला धारेवर धरत जाब विचारला आहे. एका ठराविक काल मर्यादेत काम करण्याचे अधिकाऱ्यांना बंधन घाला, अशी मागणी नागरिकांनी जनता दरबारात मंत्री बावनकुळेंकडे केली आहे.

हेही वाचा :.

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींची संकटं होणार दूर, बाप्पा करणार रक्षण

मनसे नेत्याला गांजा तस्करी प्रकरणी अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

दिलासादायक ! मुसळधार पडणाऱ्या मान्सूनची गती आता मंदावणार; शुक्रवारपासून तर…