महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(Bahin) योजना राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत आहे. याअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळतात. मात्र काही महिलांनी नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतल्याने आता सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे, जेणेकरून योग्य लाभार्थ्यांनाच पैसे मिळू शकतील.

महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी e-KYC प्रक्रियेबाबत सर्व माहिती सार्वजनिक केली आहे. त्यानुसार, महिलांनी खालील पद्धतीने e-KYC करावी:
सर्वप्रथम संकेतस्थळाला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in
मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक करा; e-KYC फॉर्म उघडेल.
फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि Captcha Code प्रविष्ट करा, संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करा. OTP मिळाल्यावर ते Submit करा.
प्रणाली तपासेल की KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. आधी पूर्ण असल्यास संदेश दिसेल: “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे”.
पूर्ण नसेल तर, आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही तपासले जाईल.
पात्र असल्यास, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि Captcha Code नमूद करा, संमती दर्शवून Send OTP क्लिक करा. OTP मिळाल्यावर Submit करा.
त्यानंतर लाभार्थ्याला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील:
कुटुंबातील सदस्य शासकीय विभाग/मंडळ/सरकारी उपक्रमात नियमित कर्मचारी नाहीत किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत.
कुटुंबातील फक्त १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

सर्व तपशील भरल्यानंतर Submit क्लिक करा. यशस्वी झाल्यास संदेश दिसेल: “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे”.
या सोप्या प्रक्रियेमुळे लाभार्थी महिलांना लवकर आणि सुरक्षित मार्गाने योजनेचा लाभ मिळेल(Bahin). सरकारने दिलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत ही e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
सलूनमध्ये गेले ते परतलेच नाही, मध्यरात्री थेट मृतदेहच…
१० कोटी शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी २००० रुपये
मनसेला कोल्हापुरात झटका बसणार? जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?