आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात अभिषेक शर्माने केलेल्या तडाखेबंद अर्धशतकामुळे भारताने विजय मिळवला आणि हा तरुण स्टार देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मैदानावरील त्याच्या या चमकदार खेळीसोबतच आता त्याच्या कथित गर्लफ्रेंड लैला(Laila) फैजल हिचीही चर्चा सगळीकडे रंगू लागली आहे.

दिल्लीची रहिवासी लैला फैजल ही एक मॉडेल असून ती काश्मिरी मुस्लीम कुटुंबातून येते. आयपीएल सामन्यांदरम्यान ती अभिषेक शर्मासाठी चिअर करताना अनेकदा पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे तिची अभिषेकची बहीण कोमल शर्मासोबतही चांगली मैत्री आहे.लैलाने परदेशात उच्च शिक्षण घेतले आहे. तिने लंडनमधील किंग्ज कॉलेजमधून मानसशास्त्रात बीएससी पूर्ण केले आहे. शिक्षणादरम्यान तिने काही आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड्समध्ये इंटर्नशीप केली आणि याच काळात फॅशन इंडस्ट्रीत काम करण्याची आवड निर्माण झाली.

लैला (Laila)फैजलने तिच्या आईसोबत मिळून ‘लैला-रुही फैजल डिझाईन्स’ हे फॅशन लेबल सुरू केले आहे. या ब्रँडला हळूहळू लोकप्रियता मिळत असून आता अभिषेक शर्मासोबत नाव जोडल्यामुळे ती अचानक प्रकाशझोतात आली आहे.अभिषेक शर्माच्या दमदार कामगिरीसोबतच लैला फैजलचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. क्रिकेट आणि ग्लॅमर यांची ही जोडी सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा नवा विषय ठरत आहे.
हेही वाचा :
8 वर्षांच्या मुलीच्या तोंडात अडकला च्युइंगम Video Viral
आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजसह खरेदी करा हे महत्त्वाचे स्टॉक्स,
महिलांमध्ये वाढते ब्रेन फॉगची समस्या!