बॉलिवूड अभिनेत्री(actress) अमीषा पटेल हीने ‘गदर’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून लोकप्रियता मिळवली आहे. प्रोफेशनल आयुष्यात सतत चर्चेत असणारी अमीषा मात्र, वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच शांत आणि खाजगी राहिली आहे. सध्या तिचं वय 50 वर्षं असून तिने अद्याप लग्न केलेलं नाही. अलीकडेच तिने एका पॉडकास्टमध्ये एक विधान केलं आहे. ज्यामध्ये ती पुन्हा चर्चेत आली आहे.

रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अमीषाने सांगितलं की, ‘मला टॉम क्रूजवर कायमच क्रश आहे. माझ्या शालेय जीवनापासून मी त्याची फॅन आहे. माझ्या पेनसिल बॉक्सवर, फाइल्समध्ये आणि रूममधल्या पोस्टरवर फक्त टॉम क्रूजचे फोटो होते. आजही मी मजाक करत म्हणते की, टॉम क्रूज हा एकमेव माणूस आहे ज्यासाठी मी माझे नियम बाजूला ठेवू शकते. त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. जर कुणी विचारलं की मी त्याच्यासोबत वन नाईट स्टँड करू शकते का? तर माझं उत्तर होय असंच असेल’. यासोबतच तिने हेही सांगितलं की, जर रणवीरने टॉम क्रूजला पॉडकास्टसाठी आमंत्रित केलं तर तिला देखील बोलावावं.

अमीषाने(actress)या मुलाखतीत आपल्या भूतकाळातील नातेसंबंधाबद्दलही सांगितलं आहे. तिने उघड केलं की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ती एका सीरियस रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, तो व्यक्ती नको म्हणत होता की अमीषा सार्वजनिक आयुष्यात राहावी. शेवटी अमीषाने प्रेमाऐवजी आपल्या करिअरची निवड केली.
अमीषाने 2000 साली ‘कहो ना…प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने तिला थेट लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ‘गदर: एक प्रेम कथा’ मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाने तिचं आयुष्यच बदललं. पुढे तिने ‘हमराज’, ‘ये है जलवा’, ‘वादा’, ‘ऐलान’, ‘मेरे जीवन साथी’, ‘आप की खातिर’, ‘भूल भुलैया’, ‘गदर 2’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
अभिनेत्रीला करिअरमध्ये मोठं यश मिळवूनही अमीषा आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमीच प्रायव्हेट ठेवते. तरीदेखील तिच्या या स्पष्टवक्तेपणामुळे ती सध्या सोशल मीडियावर जास्तच चर्चेत आली आहे. तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे. अमीषा पटेलने रणवीर अल्लाहाबाडियाच्या ‘द रणवीर शो’मध्ये टॉम क्रूजवर आपला क्रश असल्याचे कबूल केले. तिने सांगितले की, शालेय जीवनापासून ती त्याची फॅन आहे आणि त्याच्यासाठी ती आपले नियम बाजूला ठेवू शकते, अगदी वन नाईट स्टँडसाठीही.

तिने मजाकेत म्हटले की, तिच्या पेनसिल बॉक्स, फाइल्स आणि रूमच्या पोस्टर्सवर फक्त टॉम क्रूजचे फोटो होते. तिने रणवीरला सांगितले की, जर त्याने टॉम क्रूजला पॉडकास्टसाठी बोलावले तर तिला पण बोलावावे फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ती एका सीरियस रिलेशनशिपमध्ये होती, पण तिचा जोडीदार तिला सार्वजनिक आयुष्यातून दूर ठेवण्यास सांगत होता. शेवटी तिने प्रेमाऐवजी करिअरची निवड केली.
हेही वाचा :
भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही
…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं