मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या ‘टू मच विथ काजोल अँण्ड ट्विंकल’ या शोची जोरदार चर्चा आहे.(breakup)अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघी सूत्रसंचालन करत असलेल्या शोमध्ये सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या जातात. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान या शोमध्ये सहभागी झाला होता. खरं तर हल्ली चित्रपटापेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेल्या सलमानने या शोमध्ये दोघींबरोबर मनमोकळेपणे गप्पा मारल्या. सलमान यापूर्वी कधीही न बोलेल्या विषयांवरही भरभरुन बोलला.

सलमान या कार्यक्रमामध्ये ब्रेकअपबद्दलही बोलला. त्याने त्याच्या ब्रेकअपबद्दल मोठा खुलासा या चर्चेदरम्यान केला. जोडप्यांमधील नातं कसं दुरावतं? दोन अखंड प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांपासून कशा दुरावतात याबद्दल सलामानने त्याची मतं मांडली. “एक पार्टनर जेव्हा दुसऱ्या पार्टनरपेक्षा अधिक पुढे जातो तेव्हा मतभेद सुरु होतात. अशावेळी असुरक्षिततेची भावना निर्माण होते,” असं सलमान म्हणाला.(breakup) सलमानचं हे विधान अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत झालेल्या त्याच्या ब्रेकअपशी जोडून पाहिलं जात आहे.

गर्लफ्रेंड सोडून जाण्यासंदर्भातही सलमान काजोल आणि ट्विंकलसमोर मनमोकळेपणे बोलला. “जेव्हा पहिली गर्लफ्रेंड मला सोडून गेली तेव्हा मला वाटलं की तिची चूक होती. दुसरी गेली तेव्हाही वाटलं की तिचीच चूक होती. तिसरीबरोबरचही असेच झाले. मला तिचीच चूक वाटली. मात्र चौथी गर्लफ्रेंड सोडून गेल्यानंतर मलाच माझ्यावर शंका आली. चूक माझी झाली की तिची याचा मी विचार करु लागलो,” असं सलमानने मुलाखतीत म्हटलं. “माझ्या ब्रेकअप्सची संख्या वाढत गेली तेव्हा मला खात्री पटली की चूक माझीच होती. खरं सांगायचं झाल्यास यासाठी जर कोणालाही दोषी ठरवायचं असेल तर मीच दोषी आहे,” असं सलमान म्हणाला.

सलमान खानने आपलीच चूक झाल्याचं या शोमध्ये प्रेमप्रकरणांबद्दल बोलताना म्हटलं. “एखादं रिलेशनशिप जमून आलं नाही तर नाही जमलं म्हणून दूर व्हावं. त्यामध्ये उगाच कोणाला दोष देण्याची गरज नाही,” (breakup)असं सलमान म्हणाला. सध्या सलमान ‘बिग बॉस 19’ होस्ट करत असून ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाच्या शूटींगमध्येही तो व्यस्त आहे.सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील प्रेमप्रकरण हे बॉलीवुडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं आणि वादग्रस्त प्रेमप्रकरण ठरलं. हे नातं 1999 मध्ये लीला भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ च्या सेटवर सुरू झालं. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनी प्रथमच एकत्र काम केले. सुरुवातीला सलमान आणि ऐश्वर्यामधील नातं फारच रोमँटिक अफेअर होते. मात्र या दोघांमध्ये वरचे वर खटके उडू लागले. सलमान ऐश्वर्यासाठी वेडा झाला होता. त्याचा हा वेडेपणा ऐश्वर्याला त्रासदायक ठरु लागला. अखेर 2002 मध्ये दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही

…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….

परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं