आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान (guilty)आमने-सामने येणार हे निश्चित झालं आहे. गुरुवारी पाकिस्तानने बांगलादेशला 11 धावांनी पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केल्याने पहिल्यांदाच दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ या स्पर्धेची फायलन खेळणार आहेत. असं असतानाच भारताला या सामन्यामध्ये स्पर्धेतील सर्व सामने जिंकवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवशिवायच मैदानात उतरावं लागेल की काय अशी जोरदार चर्चा होती. या चर्चेमागील कारण होतं पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने म्हणजेच पीसीबीने त्याच्याविरुद्ध अंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक समिती म्हणजेच आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर आता आयसीसीने या सुनावणीचा निकाल जाहीर केला आहे.

फायनलपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादव यांच्यावरील आरोपांवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर सुर्यकुमारने ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत या मोहिमेत सहभागी झालेल्या भारतीय सशस्र दलांतील जवानांबरोबरच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना विजय समर्पित केल्याचं विधान केलं होतं. यावर पीसीबीने आक्षेप घेत थेट आयसीसीकडे तक्रार नोंदवताना सुर्यकुमारने क्रिकेटच्या मैदानात ‘राजकीय विधान’ केल्याचा आरोप केला होता. (guilty)या प्रकरणावरुन नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीला सुर्यकुमार यादवही उपस्थित होता. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणावर आता आयसीसीने निर्णय दिला आहे.
सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुर्यकुमार यादवला त्यांच्या विधानाबद्दल अधिकृत इशारा दिला. भारतीय कर्णधारासोबत सुनावणीला बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन आणि क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर सुमित मल्लापूरकर हे देखील उपस्थित होते. सुर्यकुमारने केलेलं विधान खेळाची प्रतिमा खराब करू शकते असा उल्लेख असलेला ईमेल रिचर्डसन यांनी बीसीसीआयला पाठवला आहे. मात्र हा काही फार गंभीर गुन्हा नाही, असंही या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, सुर्यकुमारविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेला हा आक्षेप म्हणजे लेव्हल 1 चे उल्लंघन असल्याचं सुनावणीत स्पष्ट करण्यात आलं आहे. सुर्यकुमारला लेव्हल 1 मधील चुकांसाठी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. समाधानकारक बाब म्हणजे लेव्हल 1 अंतर्गत दोषी ठरवलेल्या कोणत्याही खेळाडूला सामना खेळण्यापासून रोखणारी बंदी घालता येऊ शकत नाही. मात्र, या अशा चुकांसाठी दोषी ठरलेल्या खेळाडूला त्याच्या सामन्यातील मानधनाच्या टक्केवारीत आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा त्याला डिमेरिट पॉइंट्स दिले जातात.

भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की यापैकी कोणतीही कारवाई झाली तरी सुर्यकुमारला जास्तीत जास्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. मात्र त्याच्यावर सामना खेळण्याची बंदी आणता येणार नाही. म्हणजेच सुर्यकुमार यादव आशिया चषक स्पर्धेच्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहे. (guilty)सुर्यकुमारला नेमका किती आर्थिक दंड केला जणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नसलं तरी त्याची चूक ही लेव्हल 1 ची असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही
…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं