ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता (wife)यांच्या निधनाची दुःखद वार्ता समोर आली आहे. 25 सप्टेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.दीपा मेहता आणि महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने आईच्या आठवणीतून एक भावनिक पोस्ट शेअर केली. आईसोबतचा जुना फोटो शेअर करत त्याने लिहिले- “मी तुला मिस करतोय मम्मा.” तसेच इतरांनी शेअर केलेल्या श्रद्धांजलीच्या पोस्टही त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर टाकल्या आहेत.

दीपा मेहता या एक प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर होत्या. त्यांचा “क्वीन ऑफ हार्ट्स” हा साड्यांचा ब्रँड विशेष लोकप्रिय आहे. कला आणि फॅशनविश्वातील अनेक मंडळींमध्ये त्यांच्या डिझाइन्सची मोठी मागणी होती. त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर हिने देखील या ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.(wife)दीपांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘बिग बॉस मराठी 5’ फेम अंकिता प्रभू वालावलकर हिने लिहिलं – “एक मार्गदर्शक हरवला… त्या एका आईपेक्षा खूप काही होत्या, त्या एक प्रेरणा होत्या. त्यांचे सामर्थ्य, धैर्य आणि साड्यांच्या स्वत:च्या व्यवसायाची निर्मिती करण्याची आवड अनेक मुलींना मोठी स्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली.’ अंकिताने त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली, तर सत्याप्रती संवेदनाही व्यक्त केल्या.

महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचं लग्न 1987 साली झालं होतं. (wife)त्यांना दोन मुले आहेत. सत्या आणि अश्वमी अशी त्यांची नावे आहेत. घटस्फोटानंतर दोन्ही मुलं दीपांसोबत राहत होती, मात्र वडील महेश मांजरेकर यांच्याशीही त्यांचं नातं चांगलं होतं. नंतर महेश मांजरेकर यांनी दुसरं लग्न केले. अभिनेत्री मेधा मांजरेकर या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत.दीपा मेहतांच्या निधनामुळे मांजरेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

असं खाल तर लवकर जाल! 


 तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;


भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!